Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लाखो ‘मोबाइल अँप्स’ वापराविना, अँप्सचं मार्केट थंडावलं!

लाखो ‘मोबाइल अँप्स’ वापराविना, अँप्सचं मार्केट थंडावलं!
, मंगळवार, 26 जुलै 2016 (12:10 IST)
आपण टेक्नो सेव्ही नाही का काय? असा प्रश्न निर्मार झालाय. ऐकून आश्चर्य वाटलं ना.. पण हे खरंय.. मोबाइल जगतात सुमारे पाच ते सहा लाख अँप्सना प्रतिसादच मिळत नसल्याची माहिती समोर आलीय. 
 
ही अँप्स डाऊनलोडच होत नसल्यानं आता या अँप्सचं मार्केटिंग मोठय़ा प्रमाणात करण्याची वेळ आलीय. व्हॉटस्अँप, फेसबुक, ट्विटर, एम इंडिकेटर अशी अनेक अँप्स आपण स्मार्ट फोनवर दररोज वापरतो. मात्र यासारखी 60 लाख अँप्स नेटच्या बाजारात उपलब्ध आहेत. 
 
एका सर्वेक्षणानुसार, अँड्रॉइड ऑपरेटिंग प्रणालीवर गुगल प्ले या अँप बाजारात 22 लाख 70 हजार 605 अँपल ऑपरेटिंग प्रणालीवर 22 लाख अँप्स विंडोज या ऑपरेटिंग प्रणालीवर 6 लाख 69 हजार अँप्स असे एकूण तब्बल 60 लाख अँप्स उपलब्ध आहेत. यातील सुमारे सहा लाख अँप डाऊनलोडशिवाय पडून असल्याचा धक्कादायक खुलासा आयटी तज्ज्ञ मयूर कुलकर्णी यांनी केलाय. स्मार्ट फोनच्या जमान्यात अनेक कामे एका क्लिकवर होत असली तरी सहा लाख अँप्स डाऊनलोडच होत नाहीत. एक तर यातल्या अनेक अँप्सची माहितीच आपल्यांपैकी अनेकांना नाहीय. तर अनेक फ्री अँप्सनाच पसंती असल्यानं पैसे मोजून अँप्स सुरु ठेवण्याकडे लोकांचा कल कमीच दिसतो. 
 
यात अँप्स बनवणं कमी गुंतवणुकीत शक्य असल्यानं अनेक हौश्या नवश्यांचे अँप्स दररोज बाजारपेठेत दाखल होतात. त्यामुळे आता अँप्सच्या मार्केटिंगमध्ये वाढ झालीय. एका क्लिकच्या आधारे अब्जावधी लोकांपर्यंत पोहोचण्याचे प्रभावी माध्यम म्हणून अँपकडे पाहिले जाते. मात्र त्याचबरोबर त्याची उपयुक्तता हाही महत्त्वाचा भाग आहे. 
 
यातील लाखो अँप्स हे शैक्षणिक उपयुक्ततेचेही आहेत. मात्र सर्वाधिक वापर हा सोशल साईट्स, गेम्स आणि मनोरंजनाच्या अँप्सचाच होतोय. नव्या मार्केटिंग फंड्यामुळे काही उपयुक्त अँप्सचा प्रसार झाला तर तो आपलं नेट ज्ञान वाढण्यात उपयोगीच ठरेल हे नक्की..

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गोळाफेकपटू इंद्रजित सिंह उत्तेजक चाचणीत दोषी