Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वर्ष नवे, फेसबुकच्या मालकाचा संकल्प नवा

वर्ष नवे, फेसबुकच्या मालकाचा संकल्प नवा
, गुरूवार, 7 जानेवारी 2016 (11:05 IST)
फेसबुकचा मालक मार्क झुकेरबर्गने या वर्षी धावण्याचा संकल्प केला आहे. मार्क झुकेरबर्गने गेल्या वर्षी पुस्तके वाचन करण्याचा संकल्प केला होता आणि तो बर्‍यापैकी पुढे नेला होता. झुकेरबर्गने मात्र या वर्षी धावण्याचा संकल्प केला आहे. मार्क झुकेरबर्गने फेसबुकवर ए ईयर ऑफ रनिंग असे एक अधिकृत पेज बनविले आहे. या पेजवर त्याने गेल्या महिन्यात भारतात आल्यावर दिल्लीतील इंडिया गेटच्या परिसरात आपल्या सहकार्‍यांसोबत धावतानाचा फोटो अपलोड केला आहे. दरम्यान, या ए ईयर ऑफ रनिंग या पेजला या आठवडय़ात 42,000 पेक्षा जास्त जणांनी लाईक करुन सहभाग घेतल्याचे समजते. गेल्या वर्षी मार्क झुकेरबर्गने अनेक पुस्तकांचे वाचन करण्याचा संकल्प केला होता. तसेच, 2016 मध्ये 365 मैल धावण्याचे ठरविले असून फेसबुक युजर्सनीही या पेज लाईक करुन त्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपले अनुभव शेअर करावे असेही मार्क झुकेबर्गने नमूद केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi