Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विवाह जुळवणार्‍या साईटस्वरून बंद होणार डेटिंग

विवाह जुळवणार्‍या साईटस्वरून बंद होणार डेटिंग
, सोमवार, 6 जून 2016 (11:46 IST)
आज जगभरात अशी अनेक विवाह जुळवणारी संकेतस्थळे आहेत, ज्यावरून डेटिंगदेखील केले जाते. त्यामुळे अशा संकेतस्थळांकडे डेटिंग साईट म्हणूनही पाहिले जाते. पण आता डेटिंगला आळा बसणार असून अशा विवाह जुळवणार्‍या वेबसाईटस्वर वादग्रस्त कंटेटही टाकला जाणार नाही. केंद्र सरकारने विवाह जुळवणार्‍या साईटस्वरून होणार्‍या फसवेगिरीला रोखण्यासाठी काही नवीन मार्गदर्शक तत्त्वे बनवली असून या मार्गदर्शक तत्त्वांना केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मंजुरी दिली आहे.
 
ह्या वेबसाईटस् आता आयटी अँक्टच्या अखत्यारित आल्या असून या साईटस्वर यूजर्सला रजिस्ट्रेशन करण्यासाठी पॅनकार्ड, बँक अकाऊंट पासबुक, ड्रायव्हिंग लायसेन्ससोबतच या कागदपत्रांची सेल्फ अटॅस्टेड कॉपीही वेबसाईटला द्यावी लागेल, ज्यांना सरकारी विभाग ओळखू शकेल. कोणत्याही वेबसाईटवर तुमचे रजिस्ट्रेशन तुमच्याकडून दिल्या गेलेल्या ई-मेल आणि फोन नंबरवर व्हेरिपिकेशन कोड आल्यानंतरच होईल. अनेक विवाह जुळवणार्‍या वेबसाईटस् ह्या 25 ते 30 वयोगटातील तरूणांमध्ये जास्त पॉप्युलर आहेत. साडे पाच कोटी लोक प्रत्येक महिन्याला अशा साईटस्वर एकत्र येतात. 69 टक्के पुरूष आणि 31 टक्के महिला जोडीदार शोधण्यासाठी साईटस् सर्च करतात. याबाबत अँसोचॅमच्या रिपोर्टनुसार, या अशा विवाह जुळवणार्‍या वेबसाईटस्चा बिझनेस आज दीड हजार कोटी रूपये इतका झाला असून हा बिझनेस 2013 मध्ये साधारण 520 कोटी इतका होता. 
 
प्रत्येक महिन्यात साधारण 55 ते 55 मिलियन लोक या साईटस् सर्च करतात. तेच प्रत्येक महिन्यात साधारण 25 लाख लोक या साईटस्वर रजिस्ट्रेशन करतात.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जोकोविकची ऐतिहासिक कामगिरी