Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

व्हॉटस्अँपमध्ये दडलेल्या ट्रिक्स माहीत आहेत का?

व्हॉटस्अँपमध्ये दडलेल्या ट्रिक्स माहीत आहेत का?
व्हॉटसअँपनं तरुणाईला भलतंच वेड लावलंय. तुमच्याही मोबाइलमध्ये व्हॉटसअँप नक्कीच असेल.. पण, यातील काही छुप्या ट्रिक्स तुम्हाला अजूनही माहीत नसतील तर आताच जाणून घ्या.. 
 
तुमच्या व्हॉटसअँपवरून इमेजेस, ऑडिओ आणि व्हिडिओ आपोआप डाऊनलोड होत असतील आणि तुमचा डाटा यामध्ये अधिक खर्च होत असेल तर हे तुम्ही बंद करू शकता. यासाठी सेटिंग चॅट सेटिंग मीडिया ऑटो डाऊनलोड मध्ये जा. दोन निळ्या टिक्स म्हणजे तुमचा मॅसेज वाचला गेलाय, हे एव्हाना तुम्हाला ठाऊक झालं असेल पण, किती वाजता हेदेखील तुम्ही पाहू शकता. यासाठी मॅसेजवर टॅप करून दाबून ठेवा त्यानंतर (i) या आयकॉनवर क्लिक करून पाहा कधी वाचला गेलाय तुमचा मॅसेज, एखाद्या संभाषणामधला काही भाग तुम्हाला संग्रहित करायचा असेल तर अगोदर ते निवडक संभाषण सिलेक्ट करा आणि -rchive chat  वर क्लिक करा. हे चॅटिंग तुमच्या मेमरी कार्डमध्ये सेव्ह होईल. तुम्ही बिझी असाल आणि अशावेळी तुमचे मित्र मात्र चॅटिंगमध्ये बिझी असतील तेव्हा चॅटिंगचा आवाज बंद करा.. 
 
त्यामुळे तुम्हाला व्यत्यय येणार नाही. मात्र नंतर तुम्ही हे संभाषण आरामात वाचू शकता. तुम्ही व्हॉटसअँप कधी उघडलं आणि मॅसेज वाचले हे समोरच्याला कळू द्यायचं नसेल तर तुम्ही सेटिंग अकाऊंट प्रायव्हसी लास्ट सीन वर क्लिक करा. आणि Nobody वर क्लिक करा. यामुळे कुणीही तुमचं लास्ट सीन पाहू शकणार नाही. एखादा आवडता ग्रुप चॅटिंग किंवा चॅटिंग होम स्क्रीनवर तत्काळ पाहण्यासाठी हे ऑप्शन आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi