Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

व्हॉटस् अँप ग्रुपमधून काढलं म्हणून अँडमिनवर हल्ला

व्हॉटस् अँप ग्रुपमधून काढलं म्हणून अँडमिनवर हल्ला
, सोमवार, 1 जून 2015 (12:11 IST)
सोशल मीडियाचा वापर जितका फायदेशीर, तितकेच त्याचे दुष्परिणामही आता पुढे येऊ लागलेत. ‘व्हॉटस् अँप’च्या ग्रुपमधून काढून टाकल्याच्या रागातून दोघांनी आपल्या सहकार्‍यावर चाकूनं हल्ला केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडलीय. 
 
उल्हासनगरमध्ये येथे बंटी गूल कुसिज्या नावाच्या कपडय़ाच्या व्यापार्‍यानं व्हॉटस् अँपवर ‘जय हो’ नावाचा ग्रुप बनवला होता. त्यामध्ये अनिल मुखी आणि नरेश रोहरा यांचादेखील समावेश होता. मात्र, ते अलील मेसेज पाठवत असल्यानं बंटीनं त्या दोघांना ग्रुपमधून काढून टाकलं. यामुळे, चिडलेल्या मुखी आणि रोहरा यांनी बंटीला धमक्या देण्यास सुरूवात केली. एवढंच नव्हे तर पैशांचा जुना वादही उकरून काढला. मात्र बंटी दाद देत नसल्यानं चिडलेल्या दोघांनी बंटीवर हल्ला केला. 
 
बुधवारी सायंकाळी बंटी दुकानात काम करत असताना बाबू गायकवाड आणि बबल्या हे दुकानात आले. त्यांनी ‘तू अनिल मुखीचे पैसे का देत नाही?’ असं विचारत बंटीच्या हातावर, छातीवर, डोक्यावर चाकूचे वार केले. जखमी बंटीला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दरम्यान, ‘हिल लाईन’ पोलिसांनी मुखी, रोहरा, बाबू, गायकवाड आणि बबल्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. उल्लेखनीय म्हणजे, बाबू हा माजी नगरसेवक सुरेश गायकवाड यांचा मुलगा आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi