Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

व्हॉट्सअँपने यूजर्सना दिली खुशखबर..

व्हॉट्सअँपने यूजर्सना दिली खुशखबर..
, शनिवार, 12 मार्च 2016 (10:28 IST)
व्हॉट्सअँपमध्ये नुकतेच इमोजी, डॉक्युमेन्ट, थर्ड पार्टी अँप शेअरिंगसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.. यानंतर व्हॉटसअँपने आपल्या अँपमध्ये आणखी काही महत्त्वाचे बदल करत यूजर्सना एक खुशखबरही दिली आहे. 
 
नवे अपडेट व्हॉट्सअँप यूजर्सना ङ्ख्रीमध्ये उपलब्ध होणार आहे. इतकेच नाही, तर या अँपवरचे पेमेंटचे ऑप्शनही हटवण्यात आले. आपल्या सेटिंग फीचरमध्ये अनेक बदल केल्याने यूजर्सची प्रोफाईल आता आणखी आकर्षक दिसणार आहे. सध्या व्हॉट्सअँपचे हे अपडेट व्हर्जन प्ले स्टोअरवर उपलब्ध नाही.. परंतु, बीटा टेस्टरवर लॉग-इन करून तुम्ही या अपडेटसची ट्रायल घेऊ शकता. कंपनी सध्या, या अपडेटच्या बीटा व्हर्जनवर काम करते. लवकरच हे प्ले स्टोअरवरही उपलब्ध होईल. अपडेट व्हर्जनमध्ये सेटिंग मेनू आणखी सोप्पा करण्यात आला आहे. आता तुम्हाला प्रोफाईल आणि स्टेटस दोन्हीही ऑप्शन एकत्रच दिसतील. यासाठी तुम्हाला वेगवेगळी सेटिंग ऑप्शन नाही तर एकाच जागी दोन्ही दिसतील. नवीन व्हर्जनमध्ये अँपचा स्पीड आणि बगची तक्रारही दूर करण्यात आली आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi