Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोशल नेटवर्किग साईटवर पोस्ट करा.. पैसे मिळवा

सोशल नेटवर्किग साईटवर पोस्ट करा.. पैसे मिळवा
, सोमवार, 21 जुलै 2014 (12:45 IST)
आजकाल अनेक तरुण-तरुणींचा फावला वेळ सोशल वेबसाईटवर जातो. पण, ज्या सोशल वेबसाईटवर तुम्ही एवढा वेळ खर्च करता त्या सोशल वेबसाईटच्या प्रॉफिटचा काही भाग तुम्हालाही मिळाला तर.. अशीच संकल्पना प्रत्यक्षात आणलीय सोशल नेटवर्किग वेबसाईट ‘बबल्यूज’नं .. या वेबसाईटवर तुम्ही पोस्ट केलेल्या मजकुरासाठी आणि त्यातून तुमचा सहभाग नोंदविण्यासाठी ही वेबसाईट तुम्हाला पैसेही देणार आहे. 
 
ही वेबसाईट जाहिरातदारांकडून कमावलेल्या पैशांचा एक भाग यूजर्ससोबत वाटणार आहे. या वेबसाईटचे फाऊंडर आहेत अरविंद दीक्षित आणि जेसन जुक्कारी.. अरविंदनं दिलेल्या माहितीनुसार, यूजर्सना सोशल अँक्टिव्हिटीजसाठी पैसे दिले जातील. यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर कोणत्याही विषयावर कमीत कमी 400 शब्दांचा मजकूर लिहावा लागेल. या पोस्टवरून आम्ही यूजर्सच्या व्यक्तित्वाला समजण्याचा प्रयत्न करू शकतो.. यूजर्सची माहिती काढण्यासाठी कुकीज फाईल्समधून यूजर्सची ब्राऊजिंग हिस्ट्रीचा वापर इथं करण्यात येणार नाही. 
 
या वेबसाईटचं पहिला बीटा / टेस्ट व्हर्जन 2012 मध्ये लॉन्च करण्यात आलं होतं. त्यावेळी, या वेबसाईटवर दहा हजार लोकांनी पोस्ट अपलोड केल्या होत्या आणि या पोस्टसाठी संपूर्ण जगभरातून 2 करोड व्हिजिटर्स या वेबसाईटला मिळाले होते. कंपनीनं व्हेंचर कॅपिटलसाठी 30 लाख डॉलर रुपये जुळवून एक नव्या डिझाईनसहीत ही वेबसाईट लॉन्च केलीय. 
 
अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, भारत, फिलिपिन्स आणि ब्राझीलमधून या वेबसाईटल यूजर्स मिळाले होते. ‘बबल्यूज’वर सर्व पोस्ट सार्वजनिक असतील आणि कोणतीही व्यक्ती कोणतीही पोस्ट फॉलो करू शकेल.. तसंच जास्त मित्र किंवा फॉलोअर्सशिवाय तुमच्या लिखाणाला इथं वाचक मिळतील. इथं तुम्ही कोणत्याही विषयावर लिहू शकता. सध्या या वेबसाईटवर केवळ इंग्रजीमध्ये लिहिण्याची सोय आहे. लवकरच याला इतर भाषांमध्येही आणण्याचं काम सुरू असल्याचं सांगण्यात येतंय.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi