Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोशल मीडियावर सुरक्षित राहण्याचे सोपे उपाय!

सोशल मीडियावर सुरक्षित राहण्याचे सोपे उपाय!
, शनिवार, 9 एप्रिल 2016 (13:23 IST)
डिजिटल क्रांतीच्या या जमान्यात इंटरनेट आणि सोशल मीडिया तरुणांसाठी ‘ऑक्सिजन’च झालंय. सोशल मीडियाचा वापर जितका फायदेशीर तितकाच जहरीदेखील ठरतोय. सोशल मीडियावरून अनेकदा लोक आपले फोटो, व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करतात. कधी कधी तर अशाही डिटेल्स सोशल मीडियावर शेअर केल्या जातात, ज्या आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकतील. 
 
सोशल मीडियाचा हाच अयोग्य वापर अनेकदा असुरक्षितही ठरतो. यामुळेच तर सायबर क्राईममध्येही वाढ होतेय. परंतु, असं तुमच्याबाबतीत काही घडू नये, याची काळजी तुम्ही अगोदरपासूनच घेऊ शकता. यासाठी तुम्हाला कराव्या लागतील या आठ छोटय़ा छोटय़ा पण महत्त्वाच्या गोष्टी.. 
 
1. सोशल मीडियावर तुमचा पासवर्ड मजबूत असायला हवा.
 
2. हा पासवर्ड कुणाशीही शेअर करू नका.
 
3. सोशल मीडियावर अनावश्यक चर्चामध्ये स्वत:ला गुंतवून घेऊ नका.. एखाद्या व्यक्तीसोबत मतभेद असतील तर समोरासमोर बसून सोडवून टाका.
 
4. आपले फोटो नेहमी खासगी ठेवा.
 
5. गुगलवर सर्च करताना योग्य पद्धतीनं सर्च कराव्या.
 
6. सोशल मीडियावर अनोळखी लोकांसोबत मैत्री टाळा. आपल्या मित्रमंडळींची निवड योग्य पद्धतीनं करा.
 
7. तुमचं युझरनेम योग्य पद्धतीनं निवडा.
 
8. आपल्या मित्रमंडळींबाबत नेहमी जागरुक राहा.. त्यांच्याबद्दल माहिती ठेवा.

Share this Story:

Follow Webdunia marathi