Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्मार्टफोनपेक्षाही स्लीम ब्राव्हिया टीव्ही

स्मार्टफोनपेक्षाही स्लीम ब्राव्हिया टीव्ही
, सोमवार, 12 जानेवारी 2015 (14:19 IST)
लासवेगास येथे सुरू असलेल्या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शो 2015 मध्ये सोनीने अँड्रॉईड बेस्ड टीव्ही ब्राव्हिया 4 के सिरीजमध्ये चार नवे एलक्ष्डी टीव्ही लाँच केले असून त्यातील एक जगातला सर्वात स्लीम टीव्ही आहे. हा टीव्ही स्मार्टफोनपेक्षाही स्लीम आहे. सोनीच्या फोर के एलईडी टीव्हीच्या नव्या एक्स 9000 सी सिरीजमध्ये 55 व 65 इंची हे मॉडेल सादर केले गेले आहे. या मॉडेलची जाडी आहे अवघी 4.9 मिमी. या टीव्हीचे सर्व श्रेय कंपनीने नवीन क्रांतिकारी फ्लोटिंग स्टाईल तंत्रज्ञानाला दिले आहे. मात्र टीव्हीच्या किमती जाहीर केलेल्या नाहीत. या वर्षात साधारण सप्टेंबर आक्टोबरमध्ये हे टीव्ही बाजारात दाखल होतील. या सिरीजमधले सर्व ब्राव्हिया टीव्हीसाठी गुगल अँड्रॉईड प्लॅटफॉर्मवर चालणार असून ते गेमिंगसाठीही अतिशय मस्त आहेत. यात गुगल प्लेची सुविधाही दिली गेली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi