Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘अँमेझॉन’चीही ‘ई-मेल’ सेवा

‘अँमेझॉन’चीही ‘ई-मेल’ सेवा
, शनिवार, 31 जानेवारी 2015 (12:55 IST)
अमेरिकेतील ऑनलाइन व्यवसायातील अग्रणी ‘अँमेझॉन’नेही विस्ताराची मोहीम हाती घेतली असून, कंपनीतर्फे लवकरच ‘क्लाउड’वर आधारित ई-मेल आणि कॅलेंडर सेवा सुरू करण्यात येणार आहे. मायक्रोसॉफ्ट आउटलूक आणि अन्य ई-मेल सेवा देणार्‍या कंपन्यांना तगडी स्पर्धा देण्याच्या उद्देशाने ‘अँमेझॉन’ने हे पाऊल उचलले आहे. ‘अँमेझॉन वर्कमेल’ या नावाने ई-मेल सेवा ओळखली जाणार आहे. या सेवेद्वारे ई-मेल स्वीकारणे, पाठवणे, कॉन्टॅक्ट नियंत्रित करणे, कॅलेंडर शेअरिंग आदींचा लाभ ‘यूजर्स’ना घेता येणार आहे. या शिवाय आउटलूक आणि गुगल अँप्सच्या माध्यमातून देणार्‍या सर्व सेवांचा लाभ या मेल सेवेद्वारे घेता येणार आहे. पहिल्या टप्प्यात कॉर्पोरेट ग्राहकांवर; जे सध्या मायक्रोसॉफ्ट आउटलूक आणि अन्य सेवा पुरवठादाराची सेवा घेत आहेत त्यांच्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
 
अँमेझॉनतर्फे ही सेवा प्रामुख्याने ‘अँमेझॉन वेब सर्व्हिस’ या क्लाउड युनिटवरून प्रदान करण्यात येणार असून, दरमहा प्रती यूजर चार डॉलरचे शुल्क त्यासाठी आकारण्यात येणार आहे. प्रत्येक ग्राहकाला स्टोरेजसाठी 50 जीबी क्षमतेचा मेलबॉक्सही देण्यात येणार आहे. ‘नव्याने देण्यात येणारी ही सेवा मायक्रोसॉफ्ट आउटलूकच्याच तोडीची असून, ग्राहक सध्याच्या कॉर्पोरेट डिरेक्टरीवरूनदेखील वर्कमेल उपयोगात आणू शकतो. एन्क्रिप्शन कीची निवड करून, डेटा ठेवण्यासाठी लोकेशन निवडावे. फक्त मेलबॉक्सच्या निर्मितीसाठीच यूजरना शुल्क भरावे लागणार आहे,’ अशी माहिती अँमेझॉनतर्फे प्रसारित करण्यात आली. गेले कित्येक दिवस ग्राहकांकडून आमच्याकडे बिझनेस ई-मेल आणि कॅलेंडर सेवेसाठी विचारणा करण्यात येत होती. त्यानुसार आम्ही ही सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कंपनीचे उपाध्यक्ष पीटर डे सँटिस यांनी दिली.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi