Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘फ्लिपकार्ट’कडून समस्यांकडे दुर्लक्ष

‘फ्लिपकार्ट’कडून समस्यांकडे दुर्लक्ष
, शुक्रवार, 7 ऑगस्ट 2015 (11:16 IST)
ऑनलाइन खरेदी करणार्‍या इंटरनेट युजर्समध्ये लोकप्रिय असलेल्या ‘फ्लिपकार्ट’ कंपनीच्या डिलीव्हरी बॉईजनी गेल्या आठवडय़ाभरापासून संपाचं हत्यार उपसलं आहे.

डिलीव्हरी बॉईजनी घोषणाबाजी करत कंपनीच्या अंधेरीतील कार्यालयावर मोर्चा आणला. फ्लिपकार्ट कंपनीचा विस्तार होत असतानाच कामाचा ताणही वाढला आहे, मात्र त्या तुलनेने कर्मचार्‍यांना पुरवण्यात येणार्‍या सुविधांकडे मात्र कंपनी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप डिलीव्हरी बॉईजनी केला आहे. दिवसेंदिवस त्रास वाढत चालल्यामुळे कंपनीच्या जवळपास दीडशे कर्मचार्‍यांनी मनसेच्या कामगार संघटनेसोबत फ्लिपकार्टच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. डिलीव्हरी बॉईजचा रुद्रावतार पाहून फ्लिपकार्टच्या कर्मचार्‍यांनी कार्यालयातून काढता पाय घेतला. दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कंपनीने पोलिसांना पाचारण केलं होतं, त्यामुळे मोर्चा शांततेत पार पडला.

एकीकडे बेस्ट एम्प्लॉयरच्या यादीत अव्वल स्थान पटकावण्यासाठी महिला कर्मचार्‍यांना पेड मॅटर्निटी लीव्ह, प्रेगन्सीनंतर हव्या तशा शिफ्ट, तसेच सर्वासाठी सुरक्षित वातावरण, मूल दत्तक घेण्यासाठी भत्ता अशा उत्तमोत्तम सुविधा पुरवण्यासाठी फ्लिपकार्ट प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे डिलीव्हरी बॉईजच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi