Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

14.33 कोटी बनावट फेसबुक अकाउंट्स

14.33 कोटी बनावट फेसबुक अकाउंट्स

वेबदुनिया

WD
सामाजिक संकेतस्थळावर असलेल्या फेसबुकवर जवळपास 14.33 कोटी अकाउंट बनावट आहेत. यामध्ये भारत आणि तुर्कीसारखे विकसनशील देश आघाडीवर असल्याचे फेसबुकच्या प्रशासनाने सांगितले आहे. फेसबुकने सांगितले, की 30 सप्टेंबर 2013 पर्यंत त्यांच्याजवळ 119 कोटी अँक्टिव युजर्स आहेत. त्यापैकी 7.9 टक्के युजर्स बोगस आहेत. त्यापैकी अमेरिका व इतर देशांच्या तुलनेत भारत व तुर्की सारख्या देशांमध्ये बनावट फेसबुक अकाउंट बनवण्याचे प्रमाण अधिक आहे.

या देशातील युजर्सनी आपल्या अकाउंटव्यतिरिक्तही इतर अकाउंट तयार केले आहेत. फेसबुकने बनावट अकाउंटचे वर्णन दोन प्रकारात केले आहे. युजर मिस्क्लासिफाइड अकाउंटस आणि अनडिजायरेबल अकाउंट.

मिस्क्लासिफाइड अकाउंटमध्ये युजर व्यापार किंवा संस्थेसाठी खाते उघडतात. अनडिजायरेबल अकाउंट फेसबुकच्या नियमांविरोधात कारवाईसाठी तयार करण्यात आले आहेत. भारत आणि ब्राझील या देशातील युजर्स वाढल्याने फेसबुकचा युजर बेस 30 सप्टेंबर 2013 ला संपला. सध्या फेसबुकचे 119 कोटी युजर्स आहेत.


Share this Story:

Follow Webdunia marathi