Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Ransomware नंतर आता एंड्रॉयड यूजर्सवर Judy मैलवेयरचा धोका, 3.6 कोटी यूजर प्रभावित

Ransomware नंतर आता एंड्रॉयड यूजर्सवर Judy मैलवेयरचा धोका, 3.6 कोटी यूजर प्रभावित
नवी दिल्ली , सोमवार, 29 मे 2017 (14:23 IST)
एंड्रॉयड यूजर्स वर नवीन मालवेयर Judy ‘जूडी’चा धोका दिसून येत आहे. गूगल प्ले स्टोअरवर किमान 41 एपमध्ये  Judy मैलवेयर आढळून आले आहे. चेक प्वॉइंट सेक्योरिटी रिसर्च फर्मने दिलेल्या रिपोर्टनुसार या मैलवेयरमुळे किमान 3.6 कोटी यूजर्स प्रभावित झाले आहे.  
 
या मैलवेयरचे गांभीर्य समजून गूगलने आपल्या प्ले स्टोअर मधून एप ला हटवून दिले आहे.  
 
चेक प्वाइंटचे ब्लॉगपोस्टनुसार Judy मैलवेयर एक ऑटो क्लिकिंग एडवेयर आहे ज्याला साऊथ कोरियाची कंपनीने डेवलप केले आहे ज्याचे नाव आहे किनिविनि. हे एप एंड्रॉयड आणि आईओएस दोन्ही प्लॅटफॉर्मासाठी डेवलप करण्यात आले आहे. हे मैलवेयर एडवरटाइज़मेंटवर फाल्स क्लिक मिळवून देतात आणि या क्लिकद्वारे मैलवेयरमुळे याच्या मागच्या लोकांसाठी रेवेन्यू जेनरेट होतो.  
 
या मैलवेयर एप्सला 40 लाख ते 1.8 कोटी पर्यंत लोकांनी डाउनलोड केले आहे.   
 
काय आहे Judy मैलवेयर?
 
Judy मैलवेयरचे काम फाल्स क्लिक मिळवणे आहे आणि या फाल्स क्लिकच्या माध्यमाने डेवलपर्सचे रेवेन्यूत वाढ करणे आहे. जर या मैलवेयरचा एप तुमच्या स्मार्टफोनमध्ये डाउनलोड झाला तर हे तुमच्या डिवाइस कमांड सर्व्हरवर पूर्णपणे हावी होऊन जातो. आणि यामुळे चुकीच्या पद्धतीचे लिंक आणि एड क्लिक होऊ लागतात. प्रत्येक क्लिकच्या बदले वेबसाइट डेवलपर मैलवेयर डेवलपरला भुगतान करतो. या प्रकारे मैलवेयर डेवलपरची कमाई होते.  
 
गूगल प्ले स्टोअर जो एप रिस्क आणि मैलवेयरला सोप्यारिते ओळखण्याचा दावा करतो, त्याने यंदा गूगलच्या प्ले स्टोअरची सेक्योरिटीला    ब्रीच करून या मैलवेयरने 3.6 कोटी एंड्रॉयड यूजर्सला प्रभावित केले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इसेन्स आणि 'नाशिक रन' या स्वयंसेवी संस्थेने केली हात मिळवणी