Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतात 85 टक्के लोक मोबाइलवर पाहतात YouTube

भारतात 85 टक्के लोक मोबाइलवर पाहतात YouTube
, गुरूवार, 11 एप्रिल 2019 (15:23 IST)
देशात YouTube वापरणारे लोकांमध्ये सुमारे 85 टक्के लोक मोबाइलवर YouTube पाहतात. गेल्या वर्षी ते 73 टक्के होते. जानेवारी 2019 आकडेवारीनुसार देशातील YouTube च्या सक्रिय वापरकर्त्यांची संख्या 26.5 कोटी झाली आहे जेव्हा की गेल्या वर्षी ते 22.5 कोटी एवढे होते. यूट्यूब 11 वर्षांपासून देशात व्यवसाय करत आहे.
 
YouTube चे वार्षिक कार्यक्रम 'ब्रँडकास्ट इंडिया' ला संबोधित करताना यूट्यूबच्या जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी सुजान वोज्स्की म्हणाले की 26.5 कोटी मासिक सक्रिय वापरकर्त्यांनंतर आता आमचा सर्वात मोठा दर्शक वर्ग भारतात आहे. हे जगातील सर्वात वेगवान वाढणार्‍या बाजारांपैकी एक आहे. माहिती असो किंवा मनोरंजन आज आम्ही कंटेटचा सर्वात मोठा खपत मंच आहे.
 
ते म्हणाले की गेल्या एका वर्षात मोबाइलवर YouTube दर्शकांची संख्या जलद गतीने वाढली आहे. आमच्या एकूण वापरकर्त्यांपैकी 85 टक्के हे मोबाइलवर पाहतात जेव्हा की गेल्या वर्षी ते 73 टक्के होते. ते म्हणाले की आज 1200 भारतीय YouTube चॅनेल असे आहे ज्यांच्या सब्सक्राइबरर्सची संख्या 10 लाखांहून अधिक आहे जेव्हा की 5 वर्षांपूर्वी ही संख्या फक्त 2 होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारतात Huawei च्या चार कॅमेरे असणार्‍या फोनची किंमत किती?