Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इंटरनेटचा वापरासाठी आधारकार्ड आवश्यक

इंटरनेटचा वापरासाठी आधारकार्ड आवश्यक
, गुरूवार, 30 नोव्हेंबर 2017 (09:38 IST)

आता इंटरनेटचा वापर करता यावा यासाठीदेखील आधारकार्ड असणं आवश्यक असणार आहे. देशात इंटरनेटची सेवा देणा-या कंपन्या आता ग्राहकांकडून त्यांचा आधार कार्ड क्रमांक मिळाल्यानंतरच इंटरनेटची सेवा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.  

इंटरनेटची सेवा देणा-या कंपन्या आता आपल्या सेवा पुरवण्यापूर्वी ग्राहकांकडून त्यांचा युनिक आयडेन्टिटी नंबरचा तपशील मागणार आहेत. त्यामुळे आता आधार क्रमांकाविना कोणत्याही ग्राहकाला इंटरनेट कनेक्शन आणि संबंधित अन्य सेवा मिळणार नाहीत.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राहुल गांधी यांचे मोदींवर ट्वीटर अस्त्र विरोधक अडचणीत