कोरोना व्हायरसमुळे देश आणि जगभरात अनेक देशांमध्ये लॉकडाउन झाल्याने लाखो लोकं वर्क फ्रॉम होम करत आहे. घरुन काम करताना मीटिंगसाठी स्काइप किंवा जूम साखरे व्हिडिओ कॉलिंग भाग अॅप वापरण्यात येत आहे. जूमची प्रसिद्धी एवढी वाढली आहे की व्हिडिओ कॉन्फ्रेसिंगमध्ये मायक्रोसॉफ्टच्या स्काइपला देखील पछाडले आहे.
डाउनलोडिंगमध्ये जूम अॅप गूगल प्ले-स्टोअर अॅपल अॅप स्टोअर टॉप ट्रेडिंगमध्ये आहे परंतू आता याचा सिक्योरिटी आणि प्रायव्हेसीबद्दल प्रश्न उभे राहू लागले आहेत.
भारताच्या कॉम्प्यूटर इमरजेंसी रिस्पांस टीम आणि राष्ट्रीय सायबर-सुरक्षा एजेंसीने जूमच्या सिक्योरिटीबद्दल लोकांना सतर्क केलं आहे. CERT-In ने म्हटले आहे जूम अॅप सायबर हल्ल्याचं कारण बनू शकतं. या अॅपद्वारे सायबर गुन्हेगार शासकीय आणि खाजगी कार्यालयांतून डेटा चोरी करुन चुकीचा वापर करु शकतात. सीईआरटीने म्हटले की जूम अॅपसह डेटा लीक होण्याचा धोका आहे. एजेंसीने सल्ला दिला आहे की जूम अॅप वापरुन आधी अॅप अप-टू-डेट ठेवा आणि मजबूत पासवर्ड ठेवा. या व्यतिरिक्त अॅपमध्ये वेटिंग फीचर ऑन ठेवा ज्याने मीटिंगमध्ये भाग घेणार्या लोकांवर नियंत्रण ठेवता येऊ शकता.
जूमच्या सीईओ एरिक एस युआन यांनी एक ब्लॉगद्वारे सांगितले की डिसेंबर 2019 मध्ये जूमचे डेली अॅक्टिव यूजर्सची संख्या 10 मिलियन अर्थात एक कोटी होती. आता 2020 मध्ये 200 मिलियन म्हणजे 20 कोटी झाल आहे. त्यांनी सांगितले की महामारीमुळे जगभरातील 20 देशांचे 90,000 हून अधिक स्कूल्स देखील जूम अॅप वापरत आहे.
सीईओ यांनी सिक्योरिटीवर केले जात असलेल्या प्रश्नांवर म्हटलं की पुढील ९० दिवस दिवस कंपनी कोणतेही नवीन फीचर न आणता त्याऐवजी सुरक्षा आणि गोपनीयतेच्या मुद्द्यांवर कार्य करेल. आवश्यक ती पावलं उचलली जात आहेत