Publish Date: Wed, 12 Apr 2017 (22:40 IST)
Updated Date: Wed, 12 Apr 2017 (22:43 IST)
दूरसंचार सेवाप्रदाता कंपनी एयरसेलने आपल्या ग्राहकांसाठी राष्ट्रीय रोमिंगवर मोफत इनकमिंग कॉलची पेशकश केली आहे. यानंतर आता एयरसेलचे ग्राहक देशभरात कुठल्याही रोमिंगमध्ये मोफत इनकमिंग कॉलचा फायदा घेऊ शकता.
कंपनीचे मुख्य विपणन अधिकारी अनुपम वासुदेव यांनी एका विज्ञप्तीत म्हटले आहे की आम्ही आमच्या ग्राहकांसाठी रोमिंगवर मोफत इनकमिंग कॉलची घोषणा करताना प्रसन्न आहोत. यात त्यांना ग्रीष्मकालीन सुट्यांच्या दरम्यान प्रवास करण्यास मदत मिळेल. या सेवेचे लाभ घेण्यासाठी ग्राहकांना आपल्या एयरसेल नंबरहून *121*909हैश डायल करावे लागणार आहे.