एअरटेल लवकरच डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल विमानसेवांमध्ये हायस्पीड इंटरनेट डाटा कनेक्टीव्हिटी देणार आहे. याकरिता एअरटेलने 'सिमलेस एलायंस' सोबत करार केला आहे. यामध्ये वनवेब, एयरबस, डेल्टा आणि स्प्रिंट यासारख्या कंपन्या होत्या. या सगळयांसोबत विमानप्रवासासोबत करताना वेगावान स्वरूपात इंटरनेट सेवा मिळणार आहे. याकरिता सॅटेलाईट टेक्निकचा वापर करण्यात येणार आहे.
बर्सिलोनामध्ये आयोजित मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस 2018 दरम्यान याबाबत घोषणा करण्यात आली. सीमलेस एलायंसच्या 5 फाऊंडिंग सदस्यांसोबत इंडस्ट्रीतील अनेक सदस्य यामध्ये सहाभागी होणार आहेत. एअरटेलने दिलेल्या माहितीनुसार, सीमलेस एलायंसचे पार्टनर झाल्यानंतर मोबाईल ऑपरेटर्स आणि एअरलाईन्समध्ये नवे पर्व सुरू झाले आहे. एअरटेल सर्वाधिक दक्षिण आशिया आणि आफ्रिकेमध्ये वापरले जाते. ही सुविधा मिळाल्यास फ्लाईटमध्ये नॉन स्टॉप इंटरनेट सुविधा मिळणार आहे.