Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जियोच्या ऑफरमुळे एअरटेल नाराज, पण का?

जियोच्या ऑफरमुळे एअरटेल नाराज, पण का?
जियो समर ऑफर बंद झाल्याने नाराज उपभोक्तांना खूश करण्यासाठी रिलायन्स जियो इंफोकॉमने 'धन धना धन' ऑफर लांच केली. यात 309 रुपये किंवा याहून अधिक वन टाइम‍ रिचार्जवर दररोज एक जीबी डेटाव्यतिरिक्त तीन महिन्यांपर्यंत मोफत सेवा देण्याचा ऑफर आहे.
 
जियोच्या या ऑफरमुळे मात्र एअरटेल नाराज झाला आहे. त्याने आलोचना करत म्हटले की जियोचा हा प्लानही त्याच्या मागल्या प्लानप्रमाणेच आहे ज्यावर टेलिकॉम रेग्युलेटरने बंद घातली होती.
एअरटेल प्रवक्त्याने म्हटले की आम्ही हैराण आहोत, कारण हे ट्रायच्या निर्देशांचे उल्लंघन आहे. हे तर तोच प्लान दुसर्‍या नावाने चालवण्याची बाब आहे. अर्थात नवीन बाटलीत जुनी दारू विकण्यासारखे आहे. अथॉरिटी त्याविरोधात पाऊल उचलले अशी उमेद जाहीर केली आहे.
 
उल्लेखनीय आहे की रिलायन्स जियोने ट्रायच्या निर्देशानंतर सरप्राइज ऑफर बंद केल्यानंतर आपला नवीन ऑफर काढली. धन धना धन नावाच्या या ऑफरमध्ये यूझर्सला दर रोज 1 जीबी ते 2 जीबी पर्यंत 4 जी डेटा मिळेल. या प्लानची किंमत 309 रुपये आकारण्यात आली आहे. यात प्राइम मेंबरर्सला 84 दिवसांपर्यंत दररोज 1 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. तसेच नॉन प्राइम मेंबरर्सला या ऑफरसाठी 349 रुपये भरावे लागतील. नवीन सिम घेणार्‍यांकडून या प्लानसाठी 408 रुपये आकारण्यात येतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Disposable penis creature – Sea Slug : हे आहे रंगीन जातीचे गोगलगायी (Snails)