Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

500 पेक्षा अधिक चॅनेल्स असलेली एअरटेलची इंटरनेट टीव्ही सेवा

500 पेक्षा अधिक  चॅनेल्स असलेली एअरटेलची  इंटरनेट टीव्ही सेवा
, रविवार, 30 एप्रिल 2017 (22:22 IST)

एअरटेलने  इंटरनेट टीव्ही सेवेची घोषणा केली आहे.  या नव्या सेवेत सेट टॉप बॉक्सच्या मदतीने 500 पेक्षा जास्त सॅटेलाईट चॅनेल्स उपलब्ध होणार आहेत. तसेच या सेवेतून तुम्हाला नेटफ्लिक्स, यूट्यूब, गूगल प्ले गेम्सचा आनंद टीव्हीवर घेता येणार आहे. विशेष म्हणजे, इंटरनेट हा इपीटीव्ही असल्यानं या नव्या सेवेला  डिशची गरज भासणार नाही. या नव्या सेट टॉप बॉक्सच्या माध्यमातून लाईव्ह टीव्ही वेगळ्या अंदाजात पाहता येईल. यात तुम्ही लाईव्ह टीव्हीला पॉज करुन पाहता येईल. तसेच रिवाईंड आणि रेकॉर्डसारखे पर्याय यात उपलब्ध आहेत. शिवाय, बॉक्समधील ब्लू टूथच्या माध्यमातून मोबाईल, टॅबलेट किंवा लॅपटॉपवरील कंटेट टीव्हीवर पाहू शकता. तसेच गेम डाऊनलोड करुन कंसोलच्या मदतीने खेळू शकाल. विशेष म्हणजे, या नव्या सेट टॉप बॉक्सच्या रिमोटला तुम्ही तोंडीही कमांड देऊ शकता.

या नव्या सेट टॉप बॉक्सवर इंटरनेटची सुविधा वायफायच्या माध्यमातून उपलब्ध होईल. या वायफाय सेवेसाठी तुमच्याकडे एअरटेलचं इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचं नाही. पण जर तुमच्याकडे एअरटलेचं इंटरनेट कनेक्शन असेल, आणि तुम्ही 999 पेक्षा अधिकचे पॅकेज वापरत असाल, तर तुम्हाला इंटरनेट टीव्हीसाठी 25 जीबीचा अतिरिक्त डेटा मोफत मिळेल.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तिहेरी तलाकवर राजकीय स्वरूप नको : पंतप्रधान