Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 31 March 2025
webdunia

Amazon Mega Home Summer Sale: अमेझॉनची 4-दिवसाची सेल सुरू, ज्यात उत्कृष्ट सूट मिळत आहे

amazon announced
नवी दिल्ली , शुक्रवार, 5 मार्च 2021 (12:08 IST)
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर मेगा  होम समर सेल (Mega Home Summer Sale)  सुरू झाली आहे. विक्री 4 मार्चपासून सुरू झाली असून ती 7 मार्चपर्यंत चालणार आहे. या विक्री दरम्यान, ग्राहकांना घरगुती उपकरणे, टीव्ही, फर्निचर, खेळणी आणि उन्हाळ्याच्या इतर उत्पादनांवर आकर्षक ऑफर मिळतील.
 
HDFC कार्डवर 10 टक्के त्वरित सूट
मेगा होम समर सेल दरम्यान ग्राहकांना एलजी, सॅमसंग, व्हर्लपूल, व्होल्टास, सिंफनी आणि इतर ब्रँडवर ऑफर मिळू शकतात. एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड, क्रेडिट कार्ड ईएमआय आणि डेबिट कार्ड ईएमआयद्वारे देयकासाठी 7500 रुपयांच्या किमान खरेदीवर इन्स्टंट 10% सूट देखील मिळू शकेल. तथापि, या ऑफर अंतर्गत तुम्हाला जास्तीत जास्त 1500 रुपयांची सूट मिळू शकते. त्याचबरोबर, स्वस्त किमतीची ईएमआय, एक्सचेंज ऑफर, शेड्यूल डिलीवरी आणि इंस्‍टॉलेशन देखील मेगा होम समर सेलमध्ये देण्यात आल्या आहेत.
 
17,490 रुपयांमध्ये AC खरेदी करण्याची संधी
या सेलमध्ये 22,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीमध्ये स्प्लिट इनव्हर्टर एसी मिळत आहे. विंडो एसी 17,490 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर खरेदी करता येईल. त्याचबरोबर अमेझॉन बेसिक्सचे स्प्लिट एसी 22,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर उपलब्ध असेल.
 
इनीशिअल EMI 657रुपयांवर वर फ्रीज खरेदी करण्याची संधी
अमेझॉनच्या या विक्रीत एलजी, सॅमसंग, व्हर्लपूल, हायर, गोदरेज यासारख्या टॉप ब्रँडच्या रेफ्रिजरेटरवर 35 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत आहे. विक्री दरम्यान तुम्ही आरंभिक ईएमआयवर फक्त 657 रुपयांच्या रेफ्रिजरेटरची खरेदी करू शकता. यामध्ये एनर्जी एफिशिएंट रेफ्रिजरेटर्स 13,790 रुपयांच्या प्रारंभिक किमतीवर आणि 21,290 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत कन्‍वर्टिबल रेफ्रिजरेटर्स खरेदी करता येतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Gold Price: या 5 कारणांमुळे सोन्याची किंमत 42500 पर्यंत येऊ शकते