ई- कॉमर्स साइट आणि वेब सीरेजच्या दिग्गजाने भारतात आपलं लेटेस्ट डिव्हाइस Amazon Echo Show 5 लॉन्च केलं आहे. या डिव्हाइसमध्ये 5.5 इंच डिस्प्ले, एक मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि एक स्पीकर देण्यात आलं आहे.
Amazon Echo Show ची किंमत 22,999 रुपये आहे आणि त्याचा स्वस्त व्हेरिएंट Amazon Echo Show 5 ची किंमत 8,999 रुपये आहे. त्याच्या विक्रीसाठी 18 जुलै पर्यंत थांबाव लागेल आणि त्यात 2 कलर व्हेरिएंट मिळतील, एक पांढरा तर दुसरा काळा असेल.
* प्रायव्हेसीकडे लक्ष दिलं आहे - MediaTek MT8163 चिपसेट असलेल्या या डिव्हाइसमध्ये गोपनीयतेची विशेष काळजी घेतली आहे. यात फिजिकल शटरद्वारे फ्रंट कॅमेरा आणि बटणद्वारे मायक्रोफोन बंद केलं जाऊ शकतं. वापरकर्ते लवकरच व्हॉइस रेकॉर्डिंग हटविण्यात सक्षम असतील. हे वायफायच्या मदतीने इंटरनेटशी कनेक्ट केले जाऊ शकते आणि यात ब्लूटूथ देखील आहे.
* व्हिडिओ देखील पाहु शकता - स्क्रीनच्या मदतीने वापरकर्ता एलेक्साशी विचारलेल्या प्रश्नांना स्क्रीनवर पाहु शकतील. या कार्यांव्यतिरिक्त स्क्रीनसह इतर Echo डिव्हाइसेस जसे Amazon Echo Show 5 मध्ये म्यूजिक स्ट्रीमिंग, व्हिडिओ कॉलिंग आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओचे टीव्ही शो आणि चित्रपट, कॉम्पॅटिबल स्मार्ट डिव्हाइसेस नियंत्रित करण्यासाठी आणि अशा बर्याच गोष्टी करण्यासाठी वापरले जाऊ शकतात.