Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अमेझॅन-फ्लिपकार्ट सेल: 5 स्मार्टफोनवर सर्वोत्तम ऑफर

अमेझॅन-फ्लिपकार्ट सेल: 5 स्मार्टफोनवर सर्वोत्तम ऑफर
, मंगळवार, 22 जानेवारी 2019 (14:55 IST)
रिपब्लिक डेच्या प्रसंगी ऑनलाईन शॉपिंग कंपन्या अमेझॅन आणि फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेल घेऊन आल्या आहे. दोन्ही ई-कॉमर्स कंपन्या कपडे, गॅझेट्स, मोबाइल आणि मोबाइल अॅक्सेसरीज इत्यादींवर सूट देत आहे. आपण एक नवीन मोबाइल खरेदी करण्याची योजना करत असाल तर आपल्याकडे चांगली संधी आहे. दोन्ही इ-कॉमर्स वेबसाइट्स मोबाइल फोनवर सवलत देत आहे. एक्सचेंजमध्ये मोबाईल खरेदी केल्यावर तुम्ही अधिक सूटचा फायदा घेऊ शकता. अमेझॅनची ग्रेट इंडियन सेल 23 जानेवारीपर्यंत चालू राहील, आणि फ्लिपकार्टची रिपब्लिक डे सेल फेब्रुवारी 22 पर्यंत कायम राहील. आपल्याकडे या सूटचा फायदा घेण्यासाठी कमी वेळ राहिला आहे. या दोन्ही ई-कॉमर्स वेबसाइट्सवर मोबाइलवर सवलत किती आहे ते जाणून घ्या.
 
* या मोबाइल्सवर सवलत मिळत आहे :-
 
1. सॅमसंग गॅलॅक्सी नोट 8 - सॅमसंग गॅलॅक्सी नोट 8 वर अमेझॅन 34,700 रुपये सवलत देत आहे. अमेझॅनवर त्याची विक्री किंमत 74,690 रुपये आहे. सवलत नंतर या स्मार्टफोनची किंमत 39,990 रुपये अशी आहे. एक्सचेंजमध्ये मोबाईल खरेदी केल्यावर आपण 8,953 रुपयांपर्यंत अधिक सवलत घेऊ शकता.
 
2. सॅमसंग On6 - फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनची किंमत 15,490 रुपये आहे. सेल दरम्यान स्मार्टफोनवर 5,500 रुपये सवलत मिळत आहे. सवलत नंतर 9,990 रुपयांमध्ये याची खरेदी केले जाऊ शकते.
 
3. हॉनर प्ले - हुवाईच्या सब ब्रँड हॉनर प्लेवर सेल दरम्यान 8,000 रुपये सवलत मिळत आहे. सवलत नंतर, हा स्मार्टफोन 17,999 रुपये किमतीत उपलब्ध होईल.
 
4. हुवाई P20 Lite - हुवाई P20 Lite अमेझॅनवर 10,000 रुपये सवलतसह उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची किंमत 22,999 रुपये आहे. सवलत नंतर आपण 12,999 रु. वर याची खरेदी करू शकता. एक्सचेंजमध्ये आपण 8,953 रुपये सवलतचा फायदा घेऊ शकता.
 
5. शाओमी Redmi Note 5 Pro - या फोनची मूळ किंमत 14,999 रुपये आहे. स्मार्टफोनवर 4000 रुपये सवलत मिळत आहे, त्यानंतर आपण 10,999 रुपयात खरेदी करू शकता. एक्सचेंज ऑफरमध्ये खरेदी केल्यावर 10,450 रुपये सवलतचा फायदा घेऊ शकता.
 
* हे ऑफर देखील उपलब्ध आहे - इ-कॉमर्स कंपन्या अमेझॅन आणि फ्लिपकार्टच्या रिपब्लिक डे सेल 20 जानेवारी रोजी सुरू झाल्या आहे. 3 दिवसापर्यंत चालणार्‍या या सेलमध्ये शाओमी, रीअलमी, सॅमसंग, ओप्पो आणि गूगलसारखे ब्रँडचे स्मार्टफोन मोठ्या सवलतीवर उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त, नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफरसारखे पर्याय देखील उपलब्ध आहे. एसबीआय क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सने पैसे भरल्यानंतर 10% अतिरिक्त सवलत देखील मिळेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आयसीसी कसोटी मानांकन : भारत आणि कर्णधार कोहली क्रवारीत अव्वलस्थानी कायम