Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Fuchsia OS ने Andorid ची जागा घेणे सुरू केले

Fuchsia OS ने Andorid ची जागा घेणे सुरू केले
, सोमवार, 1 जुलै 2019 (14:39 IST)
गूगलचे फोन ऑपरेटिंग सिस्टम (ओएस) एंड्रॉयडच्या जागेवर येणारे नवीन ओएस फ्यूशियाने काम करणे सुरू केले आहे. आता कंपनीने काही खास डेवलपर वेबसाइटसाठी बिना कुठलेही गोंधळ करता फ्यूशियाला दिले आहे. त्याशिवाय त्या वेबसाइट्सने नवीन ओएसबद्दल काही नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
 
सुरुवातीत गूगलने म्हटले की फ्यूशिया ओएस लिनक्स नाही आहे. नवीन ऑपरेटिंग सिस्टम जिरकॉन मिक्रोकेर्नल आधारित असेल. हा डिवाइस फोन, टॅबलेट आणि कॉम्प्युटर तिघांवर सपोर्ट करेल. गूगल काही वर्षांपासून आपल्या नवीन ऑपरेटिंग सिस्टमवर काम करत आहे, ज्यामुळे तो वर्तमान काळात कॉम्प्युटर आणि फोनवर चालणारे ओएस एंड्रॉयड आणि क्रोमला बदलण्यास इच्छुक आहे.
 
सांगायचे म्हणजे गूगलचे क्रोम ब्राउझरशिवाय एक क्रोम ऑपरेटिंग सिस्टम देखील आहे जे लॅपटॉप आणि डेस्कटॉपला सपोर्ट करतो. जसे की कंपनीने या अगोदर देखील सांगितले आहे की यात ते सर्व फीचर असतील, जे सर्व डिवाइसला संपर्क स्थापित करण्यास मदत करेल. मागच्या वर्षी एंड्रॉयड अध्यक्ष हिरोशी लोकहीमरने देखील माहिती दिली होती की फ्यूशियाचे उद्देश सर्व डिवाइसमध्ये एकरूपता आणणे आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फेक न्यूड्स: महिलांचे डिजिटली कपडे काढणारं अॅप बंद