कॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये Asus ने ड्यूल स्क्रीन असणारा लॅपटॉप लाँच केला आहे. लॅपटॉपची दुसरी स्क्रीन कीबोर्डाच्या भागात आहे. ही स्क्रीन 4K रेझोल्यूशनला सर्पोट करते. या लॅपटॉपचे नाव जेनबुक प्रो डुओ असे आहे. इव्हेंटमध्ये आसुसने जेनबुक 30 एडिशन, जेनबुक 13, जेनबुक 14 आणि जेनबुक 15 लॅपटॉप देखील लाँच केले आहेत.
जाणून घ्या वैशिष्ट्ये-
Asus ZenBook Pro Duo असं या लॅपटॉपचं नाव असून हे जगातील पहिला दोन स्क्रीन असलेला लॅपटॉप आहे.
ZenBook Pro Duo मध्ये दुसरी स्क्रीन कीबोर्डच्या अगदी वरच्या बाजूला देण्यात आली आहे.
दोन स्क्रीन असलेल्या या लॅपटॉपमध्ये स्क्रीन साइज 15.6 इंच आहे. 4K UHD OLED HDR सपोर्टिंग टच स्क्रीन देण्यात आली आहे.
युजर्स कोणतीही विंडो दुसऱ्या स्क्रीनवर ड्रॅग करू शकतात.
या स्क्रीनमध्ये नॅनो बेजल देण्यात आले आहे ज्याने यूजर्सला फुल व्यूह एक्सपीरियंस मिळेल.
सेकंड सक्रीनच्या खालीलबाजूला कीबोर्ड फिक्स केले आहे ज्याच्या जवळ सेंसर नयूमॅरिक पॅड देण्यात आले आहे.
कीबोर्डमध्ये आरामात टायपिंग करता यावं म्हणून पाम रेस्ट देण्यात आलं आहे.
लॅपटॉपमध्ये 9th जनरेशन इंटेल कोर i9 प्रोसेसर देण्यात आले आहे. यासोबत लेटेस्ट गेमिंग-ग्रेड एनवीडिया जीफोर्स RTX 2060 ग्राफिक्स आणि ब्लिस्टरिंग फास्ट स्टोरेज देण्यात आले आहे.
यात 32GB DDR4 रॅम मिळेल.
लॅपटॉपमध्ये कोणताही एसडी कार्ड सपोर्ट देण्यात आलेला नाही.
2.5 किलोग्रॅम वजनाचा हा लॅपटॉप आहे.
कंपनीने याच्या किमतीबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. तसेच भारतात या वर्षी शेवटी हा दोन स्क्रीन असलेला लॅपटॉप लाँच केला जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.