Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ATM मध्ये होणाऱ्या फसवणूका

ATM मध्ये होणाऱ्या फसवणूका
, शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 (12:27 IST)
एटीएम मधून पैसे काढताना तुमची एक चूक तुमचं खातं रिकामे करू शकतं.सायबर क्राईमच्या वाढत्या घटनांमध्ये, ऑनलाइन व्यवहार आणि एटीएममधून पैसे काढणे पूर्णपणे सुरक्षित नाही. सायबर ठग इतके हुशार आहेत की ते तुमचे खाते क्षणार्धात रिकामे करू शकतात. अशा परिस्थितीत एटीएममधून पैसे काढताना येथे नमूद केलेल्या गोष्टी लक्षात ठेवल्यास आपलं खातं सुरक्षित ठेऊ शकता.चला तर मग जाणून घेऊ या.
 
एटीएम क्लोनिंग म्हणजे काय?
आजकाल एटीएम कार्ड क्लोनिंग मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही एटीएममधून पैसे काढत असाल तर, एटीएम वापरल्यानंतर, तुम्ही ते काळजीपूर्वक तपासले पाहिजे. एटीएम कार्ड क्लोनिंगद्वारे, तुमचे सर्व खाते तपशील सहज काढले जातात आणि तुमचे खाते क्षणार्धात रिकामे होते. येथे तुमचे तपशील कसे सहज चोरले जातात आणि हॅकर्स तुमचे खाते कसे रिकामे करतात ते जाणून घेऊया.
 
सायबर चोर डेटा कसा चोरतात
डिजिटल इंडियामध्ये हॅकर्सही खूप स्मार्ट झाले आहेत. हे हॅकर्स एटीएम मशिनमधील कार्ड स्लॉटमधून ग्राहकांचे बँकिंग तपशील चोरतात. तुम्हाला माहितीही नसते आणि हे हॅकर्स एटीएम मशीनच्या कार्ड स्लॉटमध्ये असे उपकरण ठेवतात, जे तुमच्या कार्डचे तपशील स्कॅन करतात. या उपकरणाद्वारे आपले सर्व तपशील त्या उपकरणामध्ये जतन केले जातात. त्यानंतर ब्लूटूथ किंवा इतर कोणत्याही वायरलेस उपकरणाच्या मदतीने हे हॅकर्स डेटा चोरतात.
 
सतर्क कसे राहायचे?
तुमच्या डेबिट कार्डवर पूर्ण प्रवेश घेण्यासाठी हॅकरकडे तुमचा पिन क्रमांक असणे अनिवार्य आहे. तथापि, हॅकर्सकडे यासाठी देखील एक पद्धत आहे. ते तुमचा पिन नंबर कॅमेराने ट्रॅक करतात. म्हणजेच ते तुमच्या डेटाच्या चोरीसाठी पूर्णपणे तयार आहेत. अशा परिस्थितीत जेव्हाही तुम्ही पिन क्रमांक टाकाल तेव्हा तो दुसऱ्या हाताने झाकून टाका. 
 
पैसे काढण्यापूर्वी अशा प्रकारे एटीएम चेक करा
* तुम्ही एटीएममध्ये गेल्यास प्रथम एटीएम मशीनचा कार्ड स्लॉट तपासावा.
* एटीएम कार्ड स्लॉटमध्ये काही छेडछाड झाली असल्यास किंवा स्लॉट सैल असल्यास, ते वापरू नका.
* कार्ड स्लॉटमध्ये कार्ड टाकताना त्यात जळणाऱ्या 'ग्रीन लाइट'वर लक्ष ठेवा. 
* जर इथल्या स्लॉटमध्ये हिरवा दिवा असेल तर तुमचे एटीएम सुरक्षित आहे.
*  त्यात लाल किंवा इतर कोणताही दिवा जळत नसेल तर कोणत्याही स्थितीत एटीएम वापरू नका.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सातवा वेतन आयोग : सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती रुपयांनी वाढणार?