युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसवर आधारित मोबाइल अॅप भारत इंटरफेस फॉर मनी अॅपचं अपडेटेड व्हर्जन लॉन्च करण्यात आले आहे. गुगल प्ले स्टोअरवर नवं व्हर्जन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. एनपीसीआयने भीम अॅप 30 डिसेंबरला पहिल्यांदा लॉन्च केले होते आणि त्यानंतर पहिल्यांदाच अपडेटेड व्हर्जन लॉन्च करण्यात आले आहे.
भीम अॅपच्या नव्या व्हर्जनमध्ये म्हणजेच भीम 1.2 मध्ये 7 नव्या भाषांचा समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत हिंदी आणि इंग्रजी अशा दोनच भाषांमध्ये अॅप उपलब्ध होते. आता उडिया, बंगाली, तमिळल तेलुगू, मल्याळम, कन्नड, गुजराती या सात नव्या भाषा उपलब्ध असणार.
विशेष म्हणजे आता आधार नंबरला पैसे पाठवा असं नवं फीचरही समाविष्ट करण्यात आले आहे. ज्या बँक खात्यात आधार कार्ड जोडलेला आहे, त्यामध्ये पैसे पाठवणे शक्य होणार आहे.