Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता बाईक आणि कार चोरीला बसणार आळा

आता बाईक आणि कार चोरीला बसणार आळा
बाईक आणि कार यांच्या चोरीचे प्रमाणही सातत्याने वाढत आहे. मात्र एक खास डिव्हाईस लॉन्च झाले आहे. याला रियल टाईम मिनी ट्रॅकींग डिव्हाईस म्हणतात. हे डिव्हाईस कार, बाईक, बॅग किंवा इतर कोणत्याही गोष्टीसोबत कनेक्ट केल्यास ते त्या वस्तूचे रियल टाईम पोजिशन दर्शवते. त्याचे नाव आहे  सिक्योमोर (Secumore). हे डिव्हाईस तुम्हाला ऑनलाईन केवळ १५७५ रुपयांना मिळेल. 
 
या डिव्हाईसची खासियत म्हणजे हे डिव्हाईस इंटरनेटशिवाय काम करेल. त्यामुळे याचा वापर तुम्ही कुठेही करू शकता. या डिव्हाईसमध्ये एक नॅनो सिम इन्सर्ट करा आणि अॅपच्या मदतीने डिव्हाईस ट्रॅक करू शकता.हे डिव्हाईस 2G GSM/GPRS/GPS, TCP/IP नेटवर्कवर काम करेल. यात रिचार्जेबल बॅटरी आहे ज्याचे बॅकअॅप सुमारे ३ दिवस राहिल. हे वॉटरप्रुफ आहे. यात मायक्रोफोन आहे. म्हणजे हे डिव्हाईस जिथे कुठे असेल तिथल्या गोष्टी, आवाज तुम्हाला ऐकू येईल. त्याचबरोबर डिव्हाईसला SMS च्या मदतीने ही नियंत्रित करता येईल.
 
की-चेन सारखे हे डिव्हाईस असेल. त्याच्या पाठीमागे चार्जिंग प्वाइंट आणि खाली चार्जिंग ट्रे तर दूसरीकडे पॉवर बटण आणि LED दिलेली आहे.डिव्हाईसला स्मार्टफोनने कनेक्ट करण्यासाठी यात नॅनो सिमकार्ड इन्सर्ट करून कॅप नीट लावा. त्यानंतर पॉवर बटण ऑन करा. त्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये सिक्योमोर (Secumore)अॅप डाऊनलोड करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अनिल अंबानींना मोठा दिलासा