पंतप्रधान मोदी यांच्या डिजीटल इंडिया कार्यक्रमासोबत तालमेल बसवत भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)ने देशात अत्याधुनिक ऑप्टिकल ट्रांसपोर्ट नेटवर्क (NG-OTN)लाँच केला. या ट्रांसपोर्टची विशेषता याची हाय स्पीडची ब्रॉडबँड सर्विस सांगण्यात येत आहे. कंपनीचा दावा आहे की हा देशातील सर्वात हाय स्पीड देणारा ब्राडबँड असेल. संचार राज्य मंत्री मनोज सिन्हाने या NG-OTNला लाँच केले. त्यांनी सांगितले की मी देशात मॉडर्न टेक्नॉलॉजी आणि हाय स्पीड ब्रॉडबँडची सेवा उपलब्ध करवण्यासाठी BSNLची प्रशंसा करतो.
सरकारने वर्ष 2018च्या डिसेंबरपर्यंत 2,50,000 ग्राम पंचायतीत ब्रॉडबँड आणि 1,00,000 गावांमध्ये ऑप्टिकल फायबर ब्राडबँड कनेक्टिव्हिटी पोहोचण्याचा लक्ष्य निश्चित केला आहे. सिन्हा यांनी सांगितले की NG-OTN देशातील 100 शहरांमध्ये उपलब्ध आहे. या प्रोजेक्टवर 330 कोटी रुपयांची लागत आली आहे. या प्रसंगी BSNLचे अध्यक्ष आणि प्रबंध निदेशक अनुपम श्रीवास्तव यांनी म्हटले की कंपनीचे एकूण 11.5 कोटी ग्राहक आहे. NG-OTN त्यांना हाय स्पीड ब्रॉडबँड सर्विस देईल. त्यांनी म्हटले की बी.एस.एन.एल. आणि फायबर होमच्या पार्टनरशिपमुळे देशाला अशा बर्याच परियोजना मिळतील.