Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बीएसएनएलची धमाकेदार ऑफर, 36 रुपयात 1GB, तर 78 रुपयात 2GB डेटा

bsnl offer
, शनिवार, 4 फेब्रुवारी 2017 (15:54 IST)
बीएसएनएलने रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी धमाकेदार ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार आता बीएसएनएलच्या ग्राहकांना 36 रुपयात 1GB, तर 78 रुपयात 2GB डेटा मिळणार आहे. तर 291 च्या रिचार्जवर 28 दिवसांसाठी 8 GB डेटा उपलब्ध करुन दिला आहे. तसेच 78 रुपयांच्या  या रिचार्ज प्लॅनमध्ये त्याला 2 GB चा डेटा मिळणार आहे. कोणत्याही कंपनीने इतक्या कमी किमतीत डेटा उपलब्ध करुन दिला नसल्याचा दावा बीएसएनएलने केला आहे.
 
नव्या ऑफरची माहिती देताना, बीएसएनएलचे कस्टमर मोबिलिटीचे संचालक आर. के. मित्तल यांनी सांगितले की, इतर खासगी कंपन्या 50 रुपयात 1 जीबीचाच डेटा उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे आम्ही आमच्या ग्राहकांना यापेक्षी कमी दरात मोबाईल डेटा उपलब्ध करुन देत आहोत. ही ऑफर 6 फेब्रुवारीपासून देशात लागू होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. याशिवाय बीएसएनएलने या आधीच आपले नवे प्रीपेड प्लॅन घोषित केले असून, 26 रुपयांच्या स्पेशल टेरिफची मुदत 31 मार्चपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. या प्लॅननुसार 26 रुपयात 26 रुपयांचा टॉकटाईम आणि 26 दिवसांची मुदत दिली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाजप उमेदवारी पुन्हा वादात, पैसे मागत असल्याचा एमएमएस व्हायरल