Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

म्यूझिक स्ट्रीमिंग नवीन अ‍ॅप Resso लाँच

म्यूझिक स्ट्रीमिंग नवीन अ‍ॅप Resso लाँच
, शुक्रवार, 6 मार्च 2020 (10:21 IST)
TikTok कंपनी ‘बाइटडान्स’ ने भारतीय बाजारात नवीन अ‍ॅप Resso लाँच केले आहे. यामाध्यमातून कंपनीने भारतीय म्यूझिक स्ट्रीमिंग सर्व्हिस सेक्टरमध्ये एंट्री केली आहे. भारतीय बाजारात या अ‍ॅपची थेट टक्कर JioSaavn, Gaana, Spotify, Apple Music आणि YouTube Music यांच्याशी असेल.
 
बाइटडान्सचे नवीन अ‍ॅप Resso बाजारात उपलब्ध असलेल्या अन्य अ‍ॅपप्रमाणेच काम करतं. पण, यामध्ये काही नवीन फीचर आहेत, यामुळे Resso अन्य अ‍ॅप्सना टक्कर देऊ शकते. या अ‍ॅपद्वारे गाणं ऐकण्याव्यतिरिक्त तुम्ही स्वतः karaoke सोबत गाणं गाऊ शकतात. तसेच कंपनीने एक नवीन सोशल फीचर दिले असून याद्वारे युजर्स म्युझिक ट्रॅक किंवा अन्य युजर्ससोबत चर्चा करु शकतात. या नव्या सोशल फीचरमुळे युजर्सचा म्युझिक ऐकण्याचा अनुभव दर्जेदार असेल अशी कंपनीला अपेक्षा आहे. याशिवाय युजर्स ‘म्युझिक वाइब्स’चा अनुभव घेऊ शकतात आणि शेअरही करु शकतात. तसेच युजर्स एखाद्या गाण्यावर कमेंट किंवा लाइकदेखील करु शकतात. तुम्ही केलेल्या कमेंट अन्य युजर्सनाही दिसतील. यासोबत युजर्सना गाण्याचे बोल (लिरिक्स) फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर करता येतील. स्क्रीनवर गाण्याचे बोल दिसतील. कमेंट आणि सोशल मीडियावर शेअरिंगचे फीचर सामान्य आहे, पण वाइब्सद्वारे युजर्स एखाद्या गाण्याद्वारे स्वतःच्या भावना व्यक्त करु शकतात. यासाठी जीआयएफ, पिक्चर, व्हिडिओ यांचा वापर करता येईल. हे एप मोफत आहे पण मोफत मिळणाऱ्या सेवा मर्यादित आहेत. त्यामुळे काही खास सेवांसाठी पैसे द्यावे लागतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हाँगकाँगमध्ये एका पाळी कुत्र्याला कोरोनाची लागण