Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

युरोपच्या लोकसंख्येएवढे चीनमध्ये इंटरनेटचे वापरकर्ते!

युरोपच्या लोकसंख्येएवढे चीनमध्ये इंटरनेटचे वापरकर्ते!
इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या चीनमध्ये ही गेल्या वर्षात ६.२ टक्‍क्‍यांनी वाढून सुमारे ७० कोटी ३१ लाख ऐवढी झाली असून युरोपच्या एकूण लोकसंख्येएवढा चीनमध्ये इंटरनेट वापरणाऱ्यांचा हा आकडा आहे. यासंदर्भातील एका अहवालाचा दाखला देत हे वृत्त चीनमधील सरकारी मालकीचे वृत्तपत्र असलेल्या “ग्लोबल टाईम्स’ने दिले.
 
२०१६ या वर्षात देशात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या ही सुमारे ४.२ कोटींनी वाढली. चीनच्या एकूण लोकसंख्येपैकी ५३.२ % नागरिक आता इंटरनेट वापरत असल्याचे या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. स्मार्टफोन्सचा प्रचंड प्रमाणात वाढलेला वापर, हे एकंदर इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या वाढण्यामागील एक प्रमुख कारण असल्याचे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील शांघायमधील तज्ज्ञ ली यी यांनी सांगितले.
 
इंटरनेट वापरणाऱ्या नागरिकांमध्ये स्मार्टफोन वापरणाऱ्यांचे प्रमाण ९५.१ इतके प्रचंड असल्याचे आढळून आले आहे. २०१५मध्ये हे प्रमाण ९०.१ % इतके होते. याचबरोबर, इंटरनेटच्या माध्यमातूनच आर्थिक व्यवहार करणाऱ्या नागरिकांच्या संख्येतही गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ३१.२ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. चीनमध्ये स्मार्टफोन्स व इंटरनेटच्या माध्यमामधून आर्थिक व्यवहार केलेल्या नागरिकांची संख्या ४६.९ कोटी इतकी असल्याचे निष्पन्न झाले आहे. डाऊनलोड करण्यात आलेल्या “ऍप्स’मध्ये ऑनलाईन म्युझिक व व्हिडिओ, ऑनलाईन पेमेंट्‌ससंदर्भातील मोबाईल ऍप्लिकेशन्सचे प्रमाण सर्वाधिक आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बनावट नोटांचा आरबीआयकडे तपशील नाही!