Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रेल्वे तिकीट आरक्षणासाठी ‘डिजिटल पेमेंट’

रेल्वे तिकीट आरक्षणासाठी ‘डिजिटल पेमेंट’
, शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017 (11:30 IST)

आता प्रवाशांना काही सेकंदातच रेल्वेगाडीचं तिकीट आरक्षित करता येणार आहे. ‘डिजिटल पेमेंट’ला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वेनं हे पाऊल उचललं आहे. आयआरसीटीसीनं IRCTC तिकीट आरक्षित करण्याची प्रक्रिया आणखी सोपी आणि सुटसुटीत केली आहे. ई-पेलेटरच्या सहकार्यानं ‘बुक नाऊ पे लेटर’ चेकआऊट ही सुविधा सुरू केली आहे. रेल्वे राज्य मंत्र्यांनी संसदेत ही माहिती दिली. ई-पेलेटरद्वारे रेल्वे प्रवाशांना एका क्लिकनं आणि ओटीपीच्या मदतीनं काही सेकंदातच तिकीट आरक्षित करता येणार आहे. क्रेडिट कार्ड, नेटबँकिंग आदी पारंपरिक पर्यायांच्या तुलनेत तिकीट आरक्षित करण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि वेगवान होणार आहे.

यापूर्वी रेल्वेचं तिकीट आरक्षित करताना पॅन किंवा आधार कार्ड क्रमांकासह सर्व माहिती भरावी लागत होती. त्यासाठी वारंवार साईन-अप करावं लागत होतं. पण रेल्वेनं सुरु केलेल्या या नवीन सुविधेमुळं तिकीट आरक्षित करण्यासाठी आता वारंवार साईन-अप करण्याची गरज भासणार नाही, असं रेल्वे राज्य मंत्र्यांनी सांगितलं. आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर या सुविधेचा पर्याय देण्यात आला आहे. त्यावर नियम आणि अटींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात शैक्षणिक पात्रतेवर पुजारी नेमणूक