Publish Date: Wed, 14 Apr 2021 (14:51 IST)
Updated Date: Wed, 14 Apr 2021 (14:53 IST)
व्हॉट्सअॅपवर नेहमीच नवनवी फीचर्स येत असतात. सध्या एका नव्या फीचरवर काम सुरू असून यामुळे अँड्रॉइडवरील व्हॉट्सअॅप चॅट्स आयओएसवर ट्रान्सफर करणं शक्य होणार आहे. चॅट हिस्ट्री मायग्रेशन असं या फीचरचं नाव असून यामुळे आयओएस ऑपरेटिंग सिस्टिमवाला फोन घेतल्यास आपली चॅट हिस्ट्री सहज ट्रान्सफर करता येईल. सध्याच्या काळात अँड्रॉइडवरील चॅटहिस्ट्री आयओएसवर ट्रान्सफर करता येत नाही. यामुळे तुमची सगळी हिस्ट्री डिलिट होते. मात्र आता नव्या फीचरमुळे तुमचे अँड्रॉइडमधले चॅट्स आयओएसवर अगदी सहज ट्रान्सफर करता येतील.
अभय अरविंद