Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तुम्ही फोनपे, गुगलपे पेटीएम वापरताय का? तुमचं अकाउंट दुसरं कुणी वापरतंय का?

phone pe
, शुक्रवार, 2 डिसेंबर 2022 (19:00 IST)
Author,पूर्णिमा तम्मारेड्डी
यूपीआय, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातर्फे डिजिटल पेमेंट्स सेगमेंटमध्ये कार्यरत असलेल्या कंपन्यांवर मर्यादा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
 
बहुतेक यूपीआय व्यवहार हे गुगल पे, पेटीएम आणि फोनपेसारख्या थर्ड-पार्टी खासगी कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात येत असल्याने, या माध्यमांमधून होणारे व्यवहार 30 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, यासाठी काही नियम लागू करण्यात येत आहेत. 
 
या सर्वांची अंमलबजावणी झाली तर डिजिटल पेमेंट ॲप्सच्या वापरात बदल होण्याची शक्यता आहे. किंबहुना, दर महिन्याला होणाऱ्या व्यवहारांच्या संख्येवर मर्यादा आणणारे नियम लागू करण्यात येतील.
 
ही पार्श्वभूमी लक्षात घेता ही ॲप वापरताना काय काळजी घ्यावी, हे आपण जाणून घेऊ या.
 
मोबिलिटी पेमेंट ॲप्स 
रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी नेटबँकिंगमध्ये त्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्याचा सर्व तपशील माहीत असणे आवश्यक असते. तो तपशील आपल्या अकाउंटला जोडलेला असावा. तरीही तुम्ही रक्कम पाठवू शकत नसाल तर?
 
युनिफाइड  पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) हे असे तंत्रज्ञान आहे, ज्याने हा सगळा त्रास न घेता तुम्ही एखाद्या व्यक्तीला सहज रक्कम ट्रान्सफर करू शकतो. त्यासाठी तुम्हाला केवळ फोन नंबरची गरज असते.
 
ही सेवा पुरवणारी ॲप्स : गुगल पे, पेटीएम, फोन पे, व्हॉट्सॲप पे इ.
 
या ॲप्समुळे खूप सुविधा मिळते, पण ही ॲप्स काळजीपूर्वक वापरली नाहीत तर पैसे गमावण्याची शक्यताच जास्त असते.
 
विशेषतः मार्केटमध्ये अशा प्रकारची सेवा देणारी ॲप्स नव्याने दाखल होत असल्याने ही शक्यता अधिकच वाढते. यापैकी कोणती ॲप्स विश्वासार्ह आहेत आणि कोणत्या ॲप्सपासून लांब राहावे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
 
या काही प्रश्नांमुळे आपल्याला हा निर्णय घेण्यास मदत होऊ शकते : 
या ॲपला प्लेस्टोअरवर/ॲपस्टोअरवर चांगले रेटिंग आणि रिव्ह्यूज आहेत का?
हे ॲप वापरण्यासाठी आपल्याला लॉगइन करावे लागते का? लॉगइनचे नियम किती काटेकोर आहेत? पासवर्ड स्ट्राँग असावा लागतो का?
फोन उघडण्यासाठी लागणाऱ्या पासवर्डव्यतिरिक्त ॲप ओपन होण्यासाठी पासवर्ड मागितला जातो का?
ॲपच्या माध्यमातून जेव्हा रक्कम डिपॉझिट करण्यात येते किंवा प्राप्त केली जाते तेव्हा नोटफिकेशन मिळते का?
रक्कम ट्रान्सफर करण्यापूर्वी ॲप कन्फर्मेशन (खात्री) मागते का? जर जूक झाली तर ती चूक सुधारण्याची सोय आहे का?
पेमेंट करण्यापूर्वी हे ॲप कन्फर्मेशन (खात्री करून) घेते का?
इन्स्टॉल करताना ॲप कोणत्या परवानग्या घेते? या ॲपच्या तपशीलामध्ये थर्ट पार्टी कंपन्यांना डेटा पाठवल्या जाण्याची तरतूद असण्याची शक्यता नमूद करण्यात आली आहे का?
या प्रश्नांच्या उत्तरांवरून आपण, सध्या मार्केटमध्ये कोणते ॲप सुरक्षित आहे, याचा निर्णय घेऊ शकतो.
 
खालील प्रकारे मोबाइल पेमेंट ॲप सुरक्षित करा:
मल्टि-फॅक्टर ऑथेंटिकेशन - एमएफए : हे एनेबल (सक्षम) केल्याने फक्त युझरनेम आणि पासवर्ड विचारण्याव्यतिरिक्त युझरनेम व पासवर्ड प्रविष्ट केल्यावर ॲप मोबाइल क्रमांकावर किंवा ईमेल आयडीवर ओटीपी पाठवते.
 
जेव्हा योग्य ओटीपी प्रविष्ट केला जातो तेव्हाच ॲप सर्व तपशील दाखवते. त्यामुळे हे निश्चितच एनेबल (सक्षम) केले पाहिजे.
 
नोटिफिकेशन्स सेट करणे : आपल्या अकाउंटमध्ये रक्कम डिपॉझिट झाल्यावर किंवा काढल्यावर नोटिफिकेशन पाठवले जाण्याची सुविधा आपण सेट केली असेल तर जेव्हा आपल्या नकळत अकाउंटमधून रक्कम वजा होते तेव्हा आपल्याला तत्काळ सूचना मिळते.
 
अनुचित प्रकारामुळे आपले आर्थिक नुकसान झाले तर आपण तत्काळ कारवाई करू शकतो.
 
सूचना : मोबाइल नोटिफिकेशनसमवेत एसएमएस/ईमेल नोटिफिकेशनही ॲड करता येतील. पण, तुम्ही बँक बॅलेन्स सांगणारा एसएमएस वाचला आणि मग डिलीट केला तर त्याने ही समस्या दूर होईल.
 
तसे न केल्यास, जर एखाद्याने आपला फोन अनलॉक केला किंवा आपण तो चुकून अनलॉक ठेवला तर आपल्या बँकेतील शिल्लक रकमेची माहिती इतरांना मिळेल.
 
ॲपसाठी पासकोड : बहुधा, सर्व ॲप्स आपल्या फोनचा पासकोड/पासवर्ड (केवळ एकच लॉगइन पुरेसे असते) प्रविष्ट केल्यावर उपलब्ध होतात.
 
जेव्हा तुम्ही लॉग इन करता तेव्हा सर्व पेमेंट ॲप्स उपलब्ध असल्याची खातरजमा करा जेव्हा जेव्हा ॲप उघडले जाते तेव्हा पासकोड प्रविष्ट करण्याची सेटिंग तुम्ही ठेवली असेल तर हे अधिक सुरक्षित असेल.
 
मोबाइल ॲप अपडेट्स : मोबाइल ॲप्स इन्स्टॉल झाल्यावरही त्यांना अपडेट्स मिळत असतात. बहुधा हे सुरक्षेच्या समस्यांवर योजलेले उपाय असतात. त्यामुळे हे अपडेट्स विनाविलंब अपडेट करावे. हे अपडेट्स आपोआप इन्स्टॉल करण्यासाठी
 
गुगल प्ले स्टोअर ॲपमध्ये सेटिंग्ज > ऑटो अपडेट सेट करा
 
आयफोनवर, सेटिंग्ज > आयट्यून्स अँड ॲप स्टोअर > ॲप अपडेट्स सेट करा.
 
तुम्ही रक्कम कोणाला पाठवत आहात ते पाहून घ्या : पेमेंट करण्याचे अनेक मार्ग आहेत - नंबर डायल करणे, यूपीआय आयडी देणे, क्यूआर कोड स्कॅन करणे, लिंकवरून पेमेंट पाठविणे.
 
तुम्ही पुढील गोष्टींची दोन वेळा खात्री करून घ्या. तसे न केल्यास रक्कम दुसऱ्याच कुणाला तरी पाठवली जाईल. तुम्ही घोटाळ्यामध्ये अडकू शकता.
 
जेव्हा एखाद्याला पहिल्यांदाच पैसे देता तेव्हा 5 रुपयांसारखी लहान रक्कम पाठवा आणि जेव्हा ही रक्कम अपेक्षित प्राप्तकर्त्याला पोहोचली असल्याची खात्री होईल, तेव्हा उरलेली रक्क पाठवा.
 
मोबाइल पेमेंट हे कॅश पेमेंटसारखे समजावे : जेव्हा आपण एखाद्याला चुकीने कॅश देतो तेव्हा ती परत मिळणे जवळजवळ अशक्य असते (त्यांनी परत दिले तरच ते शक्य असते).
 
मोबाइलवरून केलेल्या पेमेंट्सचेही तसेच असते. यात झालेल्या घोटाळ्यात गेलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता फारच कमी असते. डिजीटल पेमेंट असेल तर ते ट्रॅक केले तर कळेल असे वाटले तरी ते परत येत नाही.
 
त्यामुळे तुम्ही दोन वेळा तपासून मगच रक्कम खर्च करावी. घाई करून नका आणि प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला.
 
फोन वापरताना घ्यायची काळजी
पेमेंट असलेला फोन वापरणे म्हणजे रक्कम असलेल्या नोटा वापरणे. अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे. त्यापैकी काही  खालीलप्रमाणे -
 
फोनमध्ये पासवर्ड/पासकोड असलाच पाहिजे. फेस रेकग्निशन आणि फिंगरप्रिंटच्या तुलनेने हे अधिक सुरक्षित असते. कारण फिंगरप्रिंट बळजबरीने घेता येऊ शकते, पण पासवर्ड आपण सांगितल्याशिवाय समोरच्याला समजू शकत नाही.
 
तीनपेक्षा जास्त वेळा चुकीचा पासवर्ड प्रविष्ट केला तर फोन आपोआप लॉक होण्याचे सेटिंग करा. कारण तो चुकीच्या माणसाच्या हाती गेला तरी त्यांना तपशील समजता कामा नये.
 
मोबाइल ॲप पेमेंटला पासवर्डचे सुरक्षाकवच असले पाहिजे.
 
तुम्ही एकाहून अधिक मोबाइल ॲप पेमेंट वापरत असाल तर एकच पासवर्ड सगळ्या ॲपसाठी वापरू नका. सर्वांचे पासवर्ड वेगवेगळे असावे. एका ॲपचा पासवर्ड लीक झाला तरी दुसरी ॲप सुरक्षित राहतील.
 
पेमेंट ॲप असलेल्या मोबाइलवर गेमिंग / लॉटरी यासारखी इतर ॲप डाऊनलोड करताना सावधानता बाळगावी. कोणत्याही फेक ॲपच्या माध्यमातून मालवेअर मोबाइलमध्ये शिरले तर पेमेंट ॲपचा वापर होऊन आर्थिक नुकसान होऊ शकते.
 
फोन हरवला असता घेण्याची काळजी :
पेमेंट ॲप असलेल्या फोनमध्ये ट्रॅकिंग सक्षम (एनेबल) असावे. आता सगळ्या कंपन्या फोनचे लोकेशन समजण्याची फॅसिलिटी उपलब्ध करून देतात.
 
पेमेंट ॲप असलेल्या फोनमधील ‘रिमोट डेटा इरेझ’ फीचर सक्षम असेल तर फोन हरवल्यानंतरही तो फोन इंटरनेटशी जोडलेला असेपर्यंत त्यावरील डेटा पुसता येऊ शकतो आणि चोरांना या ॲप्समधून रक्कम चोरता येणार नाही.
 
फोन हरवला तर अकाउंटचे पासवर्ड शक्यतो लगेच बदला किंवा बँक अकाउंटमधून रक्कम तात्पुरती काढण्याची सुविधा ठेवा. असे केल्याने, चोरांनी पेमेंट करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना त्या यश मिळणार नाही.
 
तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधा या सुविधाच राहाव्या, म्हणजे हे तंत्रज्ञान वापरताना आपण कायम सावध असले पाहिजे. तसे न केल्यास आपल्याला पैसे गमवावे लागतील.
Published By -Smita Joshi 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Forbes India Rich List 2022: भारतातील श्रीमंतांची संपत्ती $800 अब्ज झाली, या लोकांचा टॉप 10 मध्ये समावेश