Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Jio मध्ये फेसबुकची 43 हजार 574 कोटींची गुंतवणूक, 9.99 टक्के हिस्सेदारी

Jio मध्ये फेसबुकची 43 हजार 574 कोटींची गुंतवणूक, 9.99 टक्के हिस्सेदारी
, बुधवार, 22 एप्रिल 2020 (10:07 IST)
प्रसिद्ध सोशल मीडिया कंपनी फेसबुकने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या रिलायन्स जिओमध्ये तब्बल 5.7 बिलियन म्हणजे जवळपास 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.
 
फेसबुकने भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायन्स जिओमध्ये 9.99 टक्के भागभांडवल खरेदी करण्याचे जाहीर केले आहे. यामुळे आता फेसबुक ही जिओ कंपनीची सर्वात मोठी शेअर होल्डर कंपनी झाली आहे.
 
फेसबुकनं याबाबत म्हटलं आहे की, ही गुंतवणूक भारताप्रती आमची वचनबद्धता दर्शवणारी आहे. Jio ने भारतात खूप मोठे बदल घडवले आहेत. त्यामुळे आम्ही देखील आकर्षित झालो. चार वर्षांहून कमी काळात रिलायन्स जिओने 388 मिलियनहून अधिक लोकांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणलं आहे. ही बाब इनोव्हेशन आणि नवीन एंटरप्राइझेसला प्रोत्साहन देणारी आहे. यामुळं जिओच्या माध्यमातून आम्ही भारतात पहिल्यापेक्षा अधिक लोकांशी कनेक्ट करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असं फेसबुकनं म्हटलं आहे.
 
वर्ष 2016 मध्ये जिओचं लॉन्चिंग झालं. जिओने अवघ्या चार वर्षांमध्येच टेलिकॉम क्षेत्रात आपलं वचर्स्व निर्माण केलं आहे. रिलायन्सनं मोबाईल टेलिकॉमपासून होम ब्रॉडबॅंडपर्यंत प्रत्येक क्षेत्रात ई-कॉमर्सचा विस्तार केला आहे. तर दुसरीकडे भारतात फेसबुक आणि त्याच्या मॅसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपचं मोठं जाळं आहे. भारतात फेसबुकचे 400 मिलियन यूझर्स आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रिलायन्स आणि जिओचा सन्मानित भागीदार म्हणून फेसबुक इंक यांचे स्वागत