rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रात्रभर बंद राहिले फेसबुक आणि इंस्टाग्राम, यूजर्स परेशान

Facebook
जगभरात फेसबुक आणि इंस्टाग्राम बुधवार रात्रभरापासून बंद आहे. या दोन्ही प्रमुख सोशल मीडिया वेबसाइट्स सोबतच डाउन झाल्यामुळे यूजर्स परेशान होत राहिले. फेसबुकने या प्रकरणात ट्विट करत म्हटले की लवकरच या समस्येवर समाधानाचे प्रयत्न सुरू आहे.
 
भारतात फेसबुक बुधवारी रात्री सुमारे 9.30 वाजता डाउन झाले होते. याचा काही वेळानंतरच इंस्टाग्राम देखील डाउन झालं. फेसबुक मेसेंजर देखील काम करत नाहीये. अनेक लोकांना व्हाट्स अॅपवर देखील समस्यांना सामोरा जावं लागत आहे.
 
जसंच सोशल मीडिया साइट्समध्ये त्रुटी आली यूजर्सने तक्रार करायला सुरुवात केली. अनेक लोकांनी फोटो पाठवण्यात अक्षम असल्याचे सांगितले की अनेक लोकांना लॉग इन संबंधी समस्या येत होत्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळात .....