अनेक पालकांना मुलांचे इंटरनेट किंवा सोशल मीडियाचे वेड चिंताजनक वाटते आणि ते खरेही आहे. ही चिंता लक्षात घेऊन आता फेसबुक लहान मुलांसाठी एक विशेष चॅट अॅप आणत आहे. या चॅट अॅपचा कंट्रोल पालकांकडे असणार आहे.
12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना फेसबुकचा सहज, चांगला वापर करता यावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. फेसबुक टीमने मॅसेंजर प्लस अॅपचे खास वर्जन लहान मुलांसाठी आणले आहे. या अॅपमध्ये पॅरेंटल कंट्रोलचा पर्याय असणार आहे. त्यामुळे मुलाच्या फेसबुक हालचलींवर पालकांना लक्ष ठेवता येणार आहे. आता या अॅपला अमेरिकेच्या आयओएस युजर्सकडे टेस्टिंग करण्यासाठी लाँच करण्यात आले आहे.
सुरुवातीला व्हिडिओ चॅट आणि मॅसेजिंग अॅप म्हणून टेस्ट केले जाईल. 12 वर्षांखालील मुलेही आपल्या माणसांशी जोडलेले रहावेत यासाठी हे खास फेसबुक मॅसेंजर आणण्यात आल्याचे प्रोडक्ट मॅनेजर लॉरेन चेंग जाहिराती आणि आक्षेपार्ह गोष्टी नसतील. पालक मुलांच्या कॉन्टॅक्ट लिस्टला कंट्रोल करु शकतील. एखाद्या व्यक्तीशी न बोलावे असे वाटल्यास परवानगी नाकारु शकतील.