सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने युजर्ससाठी एक मजेशीर फीचर आणलं आहे. याद्वारे युजर्स स्वतःचं व्हर्च्युअल कार्टून किंवा अॅनिमेटेड कॅरेक्टर बनवू शकतात. ‘Avatars’नावाचं नवीन फीचर फेसबुक अॅपच्या लेटेस्ट व्हर्जनमध्ये आलं आहे.
नवीन फीचर अनेक चेहरे, हेअर स्टाइल आणि आउटफिट्सला सपोर्ट करतं. भारतीय युजर्सच्या दृष्टीकोनातून हे फीचर कस्टमाइज करण्यात आलं आहे, असं फेसबुककडून सांगण्यात आलं. एकदा अवतार बनवल्यानंतर युजर याच्या मदतीने आपल्या चेहऱ्याचे स्टिकर्स मेसेंजरवर पाठवू शकतात, कमेंट्समध्येही याचा वापर करता येईल.
सर्वप्रथम फोनमध्ये फेसबुक आणि मेसेंजर अॅप लेटेस्ट व्हर्जनसह अपडेट करा. या अॅप्सच्या Lite व्हर्जनवर हे फीचर काम करणार नाही हे लक्षात ठेवा. व्हर्जन अपडेट केल्यानंतर तुम्हाला अनेक ठिकाणी अवतार क्रिएट करण्याचा पर्याय मिळेल. कमेंट सेक्शनमध्ये Smily आयकॉनवर टॅप केल्यानंतर Make your Avatar असा पर्याय दिसेल. याशिवाय फेसबुक अॅप ओपन केल्यानंतर कोपऱ्यात असलेल्या तीन लाइनच्या ‘हॅमबर्गर आयकॉन’वर टॅप करु शकतात.