Flipkart ग्रांड गॅझेट सेल: 18,990 रुपयांमध्ये लॅपटॉप, 3,999 रुपयांमध्ये विकत घ्या टॅबलेट

मंगळवार, 27 ऑगस्ट 2019 (16:29 IST)
फ्लिपकार्टने स्वतंत्रता दिवस सेलनंतर आता एकदा परत गॅझेट ग्रांड डेज सेलचे आयोजन केले आहे. फ्लिपकार्टच्या या सेलची सुरुवात 27 ऑगस्ट रोजी सुरू झाली असून ही 29 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या सेलबद्दल फ्लिपकार्टचा दावा आहे की ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक प्रोडक्टर्सवर 80 टक्के सूट मिळेल. तर जाणून घेऊ या सेलबद्दल...  
 
या सेलमध्ये आसुस आणि एसर सारख्या कंपन्यांचे प्रोटेबल आणि पातळ लॅपटॉप 33,990 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आले आहे. त्याशिवाय वियरेबल डिवाइस 1,299 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आले आहे.  
 
या सेलमध्ये कोर आई5 लॅपटॉपवर कमीत कमी 10 टक्के सूट मिळत आहे. आसुसचा VivoBook कोर आई3 सातवा जेनरेशन 33,990 रुपयांमध्ये मिळत आहे. तसेच    आसुस, एसप आणि इतर कंपन्यांचे गेमिंग लॅपटॉप 49,990 रुपयांच्या सुरुवाती किमतीत मिळत आहे.  
 
तसेच तुम्ही जर स्वस्त लॅपटॉपच्या शोधात असाल तर एसरचा Aspire 3 पेंटियम गोल्ड 18,990 रुपयांमध्ये मिळत आहे. यात 1TB HDD आहे. तसेच अॅप्पलचे मॅकबुकची सुरुवाती किंमत 67,990 रुपये एवढे आहे.  
 
फ्लिपकार्टच्या सेलमध्ये टॅबलेटची गोष्ट केली तर Alcatel चा 1T7 वाय फाय वर्जन 3,999 रुपयांमध्ये मिळत आहे. तसेच मायक्रोसॉफ्टचा सरफेस गो 29,999 रुपयांमध्ये आणि ऑनरचा Honor Pad 5 17,999 रुपयांमध्ये मिळत आहे.  

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या कारचा भीषण अपघात