Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Waze अॅपमध्ये वापरू शकाल Google Assistant

Waze अॅपमध्ये वापरू शकाल Google Assistant
, शनिवार, 15 जून 2019 (15:44 IST)
Google ने आपल्या इतर नेव्हिगेशन अॅप Waze साठी नवीन फीचर सादर करण्याची घोषणा केली आहे. Waze एक समुदाय आधारित ट्रॅफिक आणि नेव्हिगेशन अॅप आहे. ही एक Google App आहे, जे प्रवासादरम्यान, टर्न-बाय-टर्न (प्रत्येक वळणावर) बोलून दिशानिर्देश देते. 
 
आता या अॅपवर Google Assistant देखील सपोर्ट करेल, जे लोकांच्या नेव्हिगेशन अनुभवला आणखी सुधारू शकेल. सोमवारी अमेरिकेत Waze App वर Google Assistant सपोर्ट करण्या संबंधित घोषणा केली गेली. त्याच वेळी, असे म्हटले जात आहे की आयफोनसाठी हे सपोर्ट लवकरच सादर केला जाईल. 
 
यातील आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे Waze वाहन चालकांसाठी खूप लोकप्रिय राहिलं आहे कारण की हे गाडी चालवताना आधीच पुढील ट्रॅफिक असल्याची माहिती देतो आणि आता यात गुगल असिस्टंट फीचरचा सपोर्ट देखील मिळेल. या अंतर्गत ते वापरण्यासाठी स्क्रीनला स्पर्श करण्याची आवश्यकता नसेल. यासह आता लोक फक्त आपल्या आवाजाच्या माध्यमातून कुठे जाण्यासाठी किंवा थांबण्यासाठी स्थान निश्चित करण्यात सक्षम अस्तील. या व्यतिरिक्त Assistant च्या सहाय्याने बोलून गाणी ऐकू शकतील, किंवा कोणालाही कॉल देखील करू शकतील. यासह ज्या रस्त्यांवर ट्रॅफिक आणि खड्डे जास्त आहे त्याएवजी इतर मार्ग शोधण्यास देखील अॅपला सांगू शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

"ठप्पा"