Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गूगलने डूडल तयार करुन केला जामिनी रॉय यांचा गौरव

गूगलने डूडल तयार करुन केला जामिनी रॉय यांचा गौरव
, मंगळवार, 11 एप्रिल 2017 (12:18 IST)
जगप्रसिद्ध भारतीय चित्रकार जामिनी रॉय आज 130 वी जयंती आहे. यानिमित्ताने  गूगलने जामिनी रॉय यांच्या कलेतून साकारलेलं चित्राचं डूडल तयार करुन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. विसाव्या शतकातील आधुनिक भारतीय चित्रकारांमध्ये जामिनी रॉय यांचं नाव अव्वल स्थानी आहे. देशाच्या सीमा ओलांडून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या मोजक्या भारतीय चित्रकारांमध्ये रॉय यांची गणना होते.चित्रकलेतील मोलाच्या योगदानाची दखल घेत, भारत सरकारने 1955 साली जामिनी रॉय यांचा ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरव केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भोसरी भूखंड प्रकरणी खडसेयांच्यावर गुन्हा दाखल