Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Google Drive मध्ये झाला मोठा बदल, रिटेन्शन पॉलिसीबद्दल महत्वाची माहिती

Google Drive मध्ये झाला मोठा बदल, रिटेन्शन पॉलिसीबद्दल महत्वाची माहिती
, मंगळवार, 22 सप्टेंबर 2020 (15:31 IST)
आपण देखील गूगल ड्राइव्ह वापरत असाल तर ही बातमी आपल्यासाठी फार महत्वाची आहे. जीमेल सारखेच गूगल देखील आपल्या ड्राइव्ह मध्ये मोठा बदल घडवून आणणार आहे. जीमेल प्रमाणेच आता गूगल ड्राइव्हच्या डिलीट केल्या गेल्या (ट्रॅश) ला 30 दिवस पर्यंत जतन करून ठेवेल नंतर डिलीट करेल. याची सुरुवात 13 ऑक्टोबर पासून होणार. 
 
गूगल ड्राईव्ह सध्या ट्रॅश फाइल्स कायमचे जतन करतं. गुगलने ड्राईव्हच्या या अद्यतनांची माहिती तिच्या एका ब्लॉग मधून दिली गेली. गूगलने म्हटले आहे, आम्ही 13 ऑक्टोबर 2020 पासून आपल्या रिटेन्शन पॉलिसी मध्ये बदल घडत आहोत. त्या अंतर्गत ट्रॅश फोल्डरमधील कोणतीही फाईल 30 दिवसानंतर स्वतःच डिलीट केली जाईल. हे धोरण जीसूट बरोबरच जीमेल वर देखील लागू होणार.
 
गूगलच्या मते वापरणाऱ्याला याचा फायदाच होणार आणि ते ही फक्त त्याच फाईल्स डिलीट करणार ज्या फाईल्स खरंच डिलीट करावयाच्या आहे. आपल्या नवीन धोरणाबद्दल गूगल लोकांना जागरूक देखील करीत आहे. गूगल लवकरच या नव्या बदल बद्दल वापरणाऱ्यांना एक बॅनर देखील दाखवणार आहे. 
 
आम्ही आपणास सांगत आहोत की गेल्या महिन्यातच गूगल ड्राइव्ह मध्ये एक मोठा बग आला होता, त्याचा फायदा घेऊन हॅकर्स ड्राईव्हचा वापर चुकीच्या पद्धतीने करू शकत होते. हॅकर्स या बगच्या साहाय्याने आपल्या फोनला देखील हॅक करू शकत होते. अहवालात म्हटले आहे की गूगल ड्राइव्ह वर या फाईल्स इमेज आणि डाक्युमेन्ट च्या स्वरूपात होऊ शकतात, परंतु गूगल ने हे बग फिक्स केल्याचे सांगितले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे आता आणखी सोपे