Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Google ची Gmail सेवा डाऊन

Google ची Gmail सेवा डाऊन
, मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021 (16:33 IST)
सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन म्हणून ओळख असलेल्या गूगल ची जीमेल सेवा डाऊन झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतात काही ठिकाणी जीमेल वापरण्यास काही तांत्रिक अडचणींना वापरकर्त्यांना सामोरं जावं लागत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार युझर्सला जीमेलवरुन कोणताही मेल पाठवता येत नाहीये. यासोबत मेल देखील इनबॉक्समध्ये येत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
 
Gmail सेवेचा भारतात सर्वाधिक वापर केला जातो. खासगी कामांपासून ते कार्यालयीन कामांपर्यंत Gmail चा वापर केला जातो. जीमेल डाऊन झाल्याचा मोठा फटका भारताला बसला आहे.
 
गुगल कडून अद्याप स्पष्टीकरण नाही
डाऊन डिडेक्टर वेबसाइटं दिलेल्या माहितीनुसार जवळपास 68 टक्के यूझर्सनं जीमेलच्या वापरात अडचणी येत असल्याची तक्रार नोंदवली आहे. देशभरातील जवळपास 18 टक्के वापरकर्त्यांनी जीमेल डाऊन झाल्याची तक्रार दिली आहे. तर 14 टक्के वापरकर्त्यांनी जीमेल लॉगइन करण्यात अडचणी येत आहेत. भारतात अनेक यूझर्स जीमेल डाऊन झाल्याची माहिती सोशल मीडियातही देत आहेत. दरम्यान गुगलकडून जीमेल डाऊन झाल्याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कथित ऑडिओ क्लिपमुळे रामदास कदमांना दसरा मेळाव्याला नो एंट्री?