Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'गूगल वन' सेवा भारतात सुरु

'गूगल वन' सेवा भारतात सुरु
, रविवार, 14 ऑक्टोबर 2018 (00:05 IST)
गूगलने नवी सेवा क्लाऊड 'गूगल वन' भारतात लॉन्च केलीय. याद्वारे गूगल फोटो, जीमेल आणि गूगल ड्राईव्ह सारख्या प्रोडक्सवर १०० जीबी ते ३० जीबीपर्यंत प्लान उपलब्ध करण्यात आलेत. भारतात त्यांचे १०० जीबी, २ टीबी, ३० टीबीचे प्लान उपलब्ध असतील. प्लानची किंमत १३० रुपये, ६५० रुपये आणि १९,५०० रुपये प्रती महिना असे असतील.
 
याच वर्षी मे महिन्यात लॉन्च झालेल्या सर्व्हिसबद्दल गूगलनं क्लाऊड सबस्क्रिप्शन सर्व्हिस जगभर पोहचवण्याचा निर्धार केलाय. अमेरिकेत ही सर्व्हिस ऑगस्ट महिन्यात लॉन्च करण्यात आली होती. यामध्ये गूगलचा 'फॅमिली प्लान'ही उपलब्ध आहे. यामध्ये युजर्स स्टोअरेज प्लान आपल्या इतर पाच सदस्यांसोबत शेअर करू शकतील. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दुर्मीळ ट्युलिप फुलाची किंमत घरापेक्षाही अधिक