Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Google security Tips: गुगल वापरताना विसरूनही या चुका करू नका, अन्यथा तुरुंगात जावे लागू शकते

Google security Tips: गुगल वापरताना विसरूनही या चुका करू नका, अन्यथा तुरुंगात जावे लागू शकते
, रविवार, 26 डिसेंबर 2021 (17:42 IST)
जगभरातील लोक सर्च इंजिन म्हणून गुगलचा वापर करतात. या सर्च इंजिनमुळे आमची अनेक कामे सुलभ झाली आहेत. आज गुगलने बराच पल्ला गाठला आहे किंवा इंटरनेट सर्फिंगच्या क्षेत्रात तिची मक्तेदारी प्रस्थापित झाली आहे. आज गूगल वापरकर्त्यांच्या गरजेनुसार त्यांना सर्वोत्तम सूचना आणत आहे. गेल्या काही वर्षांत गुगलने प्लॅटफॉर्मच्या सुरक्षेबाबत अनेक अटी आणि नियम लागू केले आहेत. अशा स्थितीत तुम्हीही गुगल वापरत असाल तर येथे काही गोष्टी करायला विसरू नका. गुगलवर केलेल्या या गोष्टी आपल्याला तुरुंगात टाकू शकतात. यामुळे आपल्याला  मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. चला तर मग त्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया, ज्या चुकूनही गुगलवर सर्च करू नयेत. 
 
1 चित्रपटाची पायरसी करणे - चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेपूर्वी तो चित्रपट ऑनलाइन लीक करणे गुन्हाच्या श्रेणीत येते. याशिवाय जर तुम्ही लीक किंवा पायरसीशी संबंधित चित्रपट डाउनलोड करत असाल तर हा देखील गुन्हा आहे. भारत सरकारने सिनेमॅटोग्राफी कायदा 1952 ला मान्यता दिली आहे. या अंतर्गत चित्रपट लीक करणे हा गंभीर गुन्हा आहे. या कायद्यानुसार सिनेमागृहांमध्ये चित्रपटांचे रेकॉर्डिंग आणि व्यापार करणाऱ्यांना 3 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो.
 
2 खाजगी फोटो आणि व्हिडिओ शेअर करणे -जर आपण एखाद्या व्यक्तीचे खाजगी फोटो आणि व्हिडिओ परवानगीशिवाय इंटरनेटवर ऑनलाइन लीक केले तर तो गंभीर गुन्हा आहे. सायबर क्राईमच्या कलमाखाली असे केल्यास तुरुंगवास होऊ शकतो.
 
3 बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया -
बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया किंवा त्यासंबंधीच्या गोष्टी गुगलवर सर्च केल्यास त्याचे वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. अशा गोष्टींचा शोध घेतल्यास आपणास थेट तुरुंगात टाकले जाऊ शकते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना चाचणी करण्यास सांगितल्यावर तरुणाने चाकूने हल्ला केला,आरोपीला अटक