Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

10 लाख गुगल अकाउंट धोक्यात

10 लाख गुगल अकाउंट धोक्यात
जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन असलेल्या गुगलच्या 10 लाखांहून अधिक अकाउंट्सवर सुरक्षेच्या बाबतीत धोका निर्माण झाला आहे. अँड्रॉइड मालवेयरचा नवा व्हर्झन गूलीगन याला जबाबदार आहे.
 
ऑनलाईन सिक्युरिटी कंपनी चेक पॉइंट सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीच्या रिपोर्टनुसार गूलीगनने गूगलचे 10 लाखांहून अधिक अकाउंट्सची माहिती चोरली आहे. गूगलने याबाबत कडक कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे. चेक पॉइंटचे हेड ऑफ मोबाइल प्रॉडक्ट्स मायकल शोलोव यांच्या मते गूलीगनने 10 लाख गुगल अकाउंटची माहिती चोरी केली आहे. हे खूप धोकादायक असू शकतं. यामुळे जीमेल, गुगल फोटो, गुगल प्ले आणि गुगल डॉक्समधून यूजर्सची माहिती चोरी केली जाऊ शकते.
 
मायकल म्हणतात की, मागच्या वर्षी हॅकर्सने त्यांची योजना पूर्णपणे बदलली. आता हॅकर्स पर्सनल कम्प्युटर्सऐवजी मोबाइल डिव्हाइसला टार्गेट करत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सिंधु मोस्ट सर्चड स्पोर्टवुमन