इंटरनेटवरील अनावश्यक वेबसाईट आणि मजकूर टाळण्यासाठी 'हर हर महादेव' नावाचे अॅप मदतीला येत आहे. हे अॅप तुमचा संगणक आणि मोबाईलला पॉर्न वेबसाईटपासून दूर तर ठेवणारच आहे. त्याचबरोबर आपल्याला भजनही ऐकवणार आहे.
वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठातील इन्स्टिट्युट ऑफ मेडीकल सायन्स (IMS-BHU) विभागातील न्यूरॉलॉजिस्टनी या अॅप निर्मिती केली आहे. हे अॅप इंटरनेटवरील पॉर्न साईट, अनावश्यक मजकूर यांच्यावर नियंत्रण ठेवणार आहे. अॅप एकदा डाऊनलोड केल्यानंतर अनावश्यक साईट ओपन करताना ते अलर्ट करेल. अयोग्य साईट ओपन होत असल्यास आपोआप आपल्या मोबाईलवर किंवा संगणकावर भजन चालू होईल.
हे अॅप वेबसाईट ब्लॉकर आणि इंटरनेट फिल्टरींगची सेवा देणार आहे. त्यामुळे युझर्स सुरक्षित नेट सर्फिंग करू शकतील. तसेच पॉर्न साईट आणि आक्षेपार्ह साईट ओपन होण्याची भीती असणार नाही, असे न्यूरॉलॉजिस्ट विभागाचे डॉ. विजयनाथ मिश्रा यांनी सांगितले.