Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कशी ओळखाल नकली गॅजेट्‌स?

कशी ओळखाल नकली गॅजेट्‌स?
आजकाल आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्‌सचा वापर करीत असतो, यामध्ये प्रामुख्याने मोबाइल फोन्स, टॅब्लेट इत्यादींचा समावेश असतो. अनेकदा आपण या वस्तू ऑनलाइन मागवत असतो किंवा एखाद्या ठिकाणी बाजारभावाच्या मानाने ती वस्तू कमी किमतीला मिळत असते, म्हणून आपण ती तिथून खरेदी करून आणतो. पण अशा वेळी आपण देत असलेल्या किमतीच्या बदल्यात आपल्या हातामध्ये 'ओरिजिनल' वस्तू मिळते आहे, की 'डुप्लिकेट' हे आपल्याला ओळखता न आल्यामुळे फसवणूक होण्याची शक्यताही असते. त्यामुळे आपण विकत घेत असलेले गॅजेट हे संपूर्णतया  'जेन्युईन' असल्याची खात्री पटल्यानंतर मगच ती वस्तू घेणे अगत्याचे ठरते. कोणतेही गॅजेट खरेदी करताना त्याचे पॅकेजिंग काळजीपूर्वक पाहावे. 'ओरिजिनल' गॅजेटच्या पॅकेजिंगवरील नावाचे आणि इतर माहितीचे प्रिंट अतिशय सुस्पष्ट अक्षरांमध्ये असते. पॅकेजिंग अलगद हलविले असता, त्याच्या आतील एकही वस्तू सुटी असलेली जाणवली तर ते गॅजेट डुप्लिकेट असण्याची शक्यता असते. ओरिजिनल गॅजेटचे पॅकेजिंग, उत्पादकांकडून अतिशय व्यवस्थित केले जाते, ट्रान्सपोर्टच्या दरम्यान किंवा इतर कोणत्याही परिस्थितीत सुटी होणार नाही.
 
आपण खरेदी केलेल्या गॅजेटबद्दलची सर्व माहिती त्याच्या सोबत असलेल्या यूजर मॅन्युअलमध्ये उपलब्ध असते. या मॅन्युअलमध्ये गॅजेटबद्दलची सर्व तांत्रिक माहिती, इंग्रजी बरोबरच, ज्या देशामध्ये ते गॅजेट बनविले गेले, त्या देशाच्या स्थानिक भाषेमध्येही उपलब्ध असते. आपल्या गॅजेट सोबत आलेल्या इतर वस्तू काळजीपूर्वक पाहाव्या. कॉर्ड, चार्जर, हेडफोन्स आणि तत्सम इतर वस्तू बनविण्यासाठी ओरिजिनल गॅजेटचे उत्पादक अतिशय उत्तम प्रतीच्या मटेरियलचा वापर करीत असतात. हेच गॅजेट जर डुप्लिकेट असेल, तर त्यासोबत असलेल्या इतर वस्तू दुय्यम दर्जाचे मटेरियल वापरून बनविल गेल्याचे पाहायला मिळते. खरेदी केलेल्या गॅजेटच्या उत्पादकाचे नाव असलेल्या फॉन्टकडे लक्ष देणेही आवश्यक आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रिक्षाचालक जिद्दीने बनले महापौर, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची सत्ता