आजच्या काळात आपण सगळेच मोबाइल फोन हाताळतो वापरतो खरं तर आज मोबाइल फोनमुळे जास्तीच्या माहिती मिळत असतात. जगातील सर्व घडामोडीची माहिती मिळते. कुठे काय घडत आहे ह्याचा सुगावा लागत असतो. हे सगळे इंटरनेट मुळे शक्य आहे. पण कधी कधी असे दिसून येते की मोबाइलमध्ये चालणारे इंटरनेट हे वाय-फाय वर अवलंबून असते आणि आपल्याला वाय-फायची गती मंद झालेली लक्षात येते. बराच वेळा आपली काही महत्त्वाची कामे पण वाय-फायच्या कमी वेगाने मंदावतात. बऱ्याच वेळा नेटवर्क मंदावल्याने वाय-फायचा वेग कमी होतो. पण कधी कधी ह्याला मंदावले नेटवर्क कारण नसून फोनची सेटिंग पण असू शकते. त्यामुळे देखील वाय-फायचे वेग कमी होते. आज या लेखात आपण आपल्या मोबाइल फोन ची सेटिंग बदलून वाय फायला वेगवान कशे करता येईल हे जाणून घेऊ या.
वाय-फाय ला वेगवान कसे करावे...?
1 फ्रिक्वेन्सी बँडच्या सेटिंगला ऑटो मोड वर करणे : फ्रिक्वेन्सी बँड वाय-फायच्या गतीला कमी जास्त करण्यात महत्त्वपूर्ण असतो. जुने फोन साठी 2.5 GHZ ला स्पोर्ट करते. पण नवे फोन 5 GHZ च्या फ्रिक्वेन्सी बँड वर काम करतात. फ्रिक्वेन्सी बँड ला ऑटोमोडला करावे. जर का आधी पासूनच हे ऑटोमोड वर आहे तर फोन स्वतः स्प्रेक्ट्म बँड वर जाईल.
फ्रिक्वेन्सी बँड ची ऑटोमोड सेटिंग करण्यासाठी सर्वप्रथम सेटिंग मध्ये जाऊन वाय-फाय ऑप्शन मध्ये जाऊन त्यात वरील बाजूस 3 डॉट वर दाबा हे वाय-फाय मेनू आहे. ह्या वर क्लिक करून आपणांस ऍडव्हान्सचे ऑप्शन येतील. त्यामध्ये जाऊन वाय फाय फ्रिक्वेन्सीला ऑटो मोड वर करा. अश्या प्रकारे आपल्या मोबाइलचे फ्रिक्वेन्सी बँड ऑटो मोड वर सेट होईल. तत्पश्चात आपले वाय फाय वेगाने काम करेल.
2 कनेक्टिव्हिटीची सेटिंग तपासणे : आपल्या फोन मधील कनेक्टिव्हिटीला तपासणे Avoid Poor Connection Setting खूप कमी स्मार्टफोन मध्ये असतात. आपल्या फोनमध्ये असल्यास याचा वापर करून आपण वाय-फाय ला वेगवान करू शकतो. Avoid Poor Connection Setting ला एनेबल करून आपण फक्त तेच वायफाय कनेक्ट करू शकतो ज्यांची कनेक्टिव्हिटी सशक्त आहे.
3 फर्मवेअर अद्यतन : आपल्या फोनचे वायफाय मंद वेगाने चालण्याचे कारण आपल्या फोन चे फर्मवेअर अद्यतन नसल्याचे होऊ शकते. कुठले ही अद्यतन शिल्लक नसल्याची खात्री करावी.असल्यास त्वरित अद्यतन करावे. असे केल्याने वायफाय चा वेग वाढेल.
4 फोनचे कव्हर तपासा : आजच्या काळात आपल्या फोन ला स्टायलिश करण्यासाठी मोबाइल ला कव्हर लावले जातात. जेणे करून त्यांचा फोन आकर्षक आणि स्टायलिश दिसायला लागतो. ह्या साठी ते गोल्ड पॉलिश, सिल्वर पॉलिशचे मेटलचे कव्हर फोनला लावतात. त्या धातूंमुळे वाय-फाय मधून निघणारी वेव्ह बाधित होऊ शकते. त्या मुळे पण वाय-फायची गती कमी होऊ शकते.
5 वाय-फायचे बुस्टर ऍप्सचा वापर करून : आपण वाय-फायचे वेग वाढवू शकता. ह्यात दिलेल्या ग्राफने वाय-फायची रेंज कळते की कुठल्या बाजूस चांगली आहे आणि कुठे कमी. त्या प्रमाणे आपण आपल्या वाय-फायला जोडून त्याचा वापर करू शकता. आपण या सर्व गोष्टींचे पालन केल्याने आपल्या फोन मधील वाय-फायची गती वाढवू शकतो.